-
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. शांत स्वभाव, परंतु ठाम भूमिका घेणारे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. (Photo: uddhavthackerayfanpage/instagram)
-
फोटोग्राफीतून राजकारणात पाऊल उद्धव ठाकरे यांची सुरुवात व्यावसायिक फोटोग्राफर म्हणून झाली होती. त्यांनी अनेक छायाचित्र प्रदर्शनंही भरवली होती. राजकीय वारसाचा भाग असतानाही सुरुवातीला पक्षाच्या कार्यात ते सक्रिय सहभाग घेत नव्हते. (Photo: uddhavthackerayfanpage/instagram)
-
शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली. शिवसेना पक्षाच्या पारंपरिक शैलीला एका नव्या आधुनिक रूपात नेत त्यांनी पक्षामध्ये बदल घडवून आणले.
-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ २०१९ मध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हा त्यांचा पहिलाच निवडणूक न लढवलेला असा मुख्यमंत्री कालावधी ठरला. (Photo: uddhavthackerayfanpage/instagram)
-
करोना काळातील नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून त्यांनी करोनाच्या कठीण काळात राज्याचं नेतृत्व केलं. सातत्याने जनतेशी संवाद साधत त्यांनी महाराष्ट्रातल्या करोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले. त्यांच्या संयमित आणि शिस्तबद्ध शैलीची अनेकांनी दखल घेतली. (Photo: uddhavthackerayfanpage/instagram)
-
रश्मी ठाकरे यांची मजबूत साथ उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे या शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’च्या कार्यकारी संपादक म्हणूनही कार्यरत राहिल्या. त्यांच्या जोडीने नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. रश्मी ठाकरे यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही विशेष मान आहे.
-
आदित्य आणि तेजस यांच्याशी घनिष्ठ नातं मोठा मुलगा आदित्य ठाकरे हे शिवसेनेत सक्रिय असून मंत्रीही झाले होते. दुसरा मुलगा तेजस ठाकरे हे राजकारणापासून दूर राहून संशोधन आणि वन्यजीव छायाचित्रणात रुची ठेवत आहेत. उद्धव यांचं दोघांशीही प्रेमळ, पण मार्गदर्शक नातं आहे. (Photo: uddhavthackerayfanpage/instagram)
-
शिवसेनेतील फूट, मुख्यमंत्रिपद गमावणं आणि निवडणूक चिन्हावरचा वाद अशा अनेक संघर्षांमध्येही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी ते सक्रिय प्रयत्न करत आहेत. (Photo: uddhavthackerayfanpage/instagram)

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”