-
भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार (FTA) झाल्यानंतर, ब्रिटनमधील अनेक प्रसिद्ध ब्रँडची दारू भारतात आता स्वस्त दरात उपलब्ध होईल. (फोटो – freepik)
-
या कराराअंतर्गत युके येथून येणाऱ्या व्हिस्कीवर लावण्यात येणारा १५० टक्के कर हळूहळू कमी करून आधी ७५ टक्के आणि नंतर पुढील १० वर्षात ४० टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल. यामुळे दारूच्या किमती कमी होतील. (फोटो – freepik)
-
जर आज एखाद्या स्कॉचची किंमत ३००० रुपये असेल तर टॅक्स कमी झाल्यावर तिच बाटली १२०० रुपयांमध्ये मिळू शकते. (फोटो – freepik)
-
तसेच जिन सारख्या प्रीमियम ड्रिंक्सची किंमत सध्या ४००० रुपये आहे, ती कमी होऊन जवळपास १६०० रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. (फोटो – freepik)
-
भारतात मिळणारी जॉनी वॉकर, चिवास रीगल, जुरा, बॉम्बे सॅफायर, बीफीटर आणि गॉर्डन्स सारख्या ब्रिटिश प्रीमियम मद्याच्या किमत बऱ्यापैकी खाली आल्याचे पाहायला मिळू शकते. (फोटो – freepik)
-
या करारानंतर भराततील पारंपरिक मद्य उद्योगाला देखील फायदा होईल. गोवा येथील फेणी, केरळची ताडी आणि नाशिकची वाइन सारखे देशी ब्रँड आता युके्चया प्रीमियम स्टोर्स आणि हॉटेल्सपर्यंत पोहचतील. (फोटो – freepik)
-
२०३० पर्यंत या क्षेत्राची निर्यात १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, सध्या ही बाजारपेठ सुमारे ३७० दशलक्ष डॉलर्सची आहे. (फोटो – freepik)
-
एफटीए लागू झाल्यानंतर, भारतातून युकेला जाणाऱ्या जवळजवळ ९९ टक्के वस्तूंवर आयात शुल्क आकारले जाणार नाही. यामध्ये कापड, औषधे, वैद्यकीय उपकरणे, चामड्याचे उत्पादने आणि रसायने यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. (फोटो – freepik)
-
यामुळे भारतीय उद्योगांना ब्रिटनमधील बाजारपेठेत संधी मिळेल. तसेच युकेबून भारतात येणाऱ्या जवळपास ९० टक्के मालांवर कस्टम ड्युटी कमी होईल. ज्यामुळे यांच्या किंमती कमी होऊ शकतात. (फोटो – freepik)

VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा