-
कर्नाटकच्या हासन लोकसभेचे माजी खासदार आणि देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. कर्नाटकच्या विशेष न्यायालयाने आज हा निकाल दिला.
-
माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी घरकाम करणाऱ्या ४७ वर्षीय महिलेवर आपल्या फार्महाऊसवर बलात्कार केला होता. तसेच या घृणास्पद प्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही त्यांनी केले होते.
-
लोकसभेची निवडणूक सुरू असताना २०२४ मध्ये प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या व्हायरल व्हिडीओचे प्रकरण समोर आले होते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रज्ज्वल रेवण्णासाठी प्रचारही केला होता. त्याचा निवडणुकीत पराभव झाला. मे २०२४ मध्ये या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आता १४ महिन्यांनी न्यायालयाने निकाल दिला आहे.
-
रेवण्णाचा माजी वाहन चालक याने न्यायालयात या प्रकरणी साक्ष दिली. त्याने सांगितले की, प्रज्ज्वल रेवण्णाच्या मोबाइलमध्ये जवळपास २००० अश्लिल फोटो होते. तर ३० ते ४० वेगवेगळ्या महिलांशी लैंगिक संबंधाचे ४०-५० व्हिडीओ होते.
-
रेवण्णाचा माजी वाहन चालक कार्तिक एन. (वय ३४) हा या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असून त्यानेच हे प्रकरण बाहेर आणले होते. प्रज्ज्वल रेवण्णाचे अश्लिल व्हिडीओ सार्वजनिक केल्याबद्दल कार्तिक एन. वरही गुन्हा दाखल झाला होता.
-
प्रज्ज्वल रेवण्णा जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा नातू आहे. त्यांचे काका एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत. कर्नाटकमधील मोठ्या राजकीय घराण्यासाठी प्रज्ज्वल रेवण्णाचा गुन्हा मोठा धक्का मानला जात आहे.
-
प्रज्ज्वल रेवण्णा विरोधात आमदार / खासदार विशेष न्यायालयात प्रकरण दाखल झाले होते. १,६९१ पानांच्या या आरोपपत्रात अनेक धक्कादायक आणि मन सुन्न करणाऱ्या बाबी पोलिसांनी नमूद केल्या आहेत.
-
आरोपपत्रात उल्लेख केल्यानुसार प्रज्ज्वल रेवण्णा पीडित महिलांना अत्याचारावेळी विशिष्ट कपडे परिधान करण्यासाठी बळजबरी करायचा. तसेच अत्याचार करत असताना बंदुकीचा धाक दाखवून हसण्यास भाग पाडायचा.
-
२०२० ते २०२३ या काळात बंदुकीचा धाक दाखवून वारंवार अत्याचार केले असल्याचे एका पीडितेने जबाबात म्हटल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
-
या सर्व घटनांचे प्रज्ज्वल रेवण्णाने चित्रीकरण केले असून जर पीडितेने बाहेर तोंड उघडल्यास सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली होती, असे पीडित महिलांनी सांगितले.
-
होलेनरासीपुरा येथील प्रज्ज्वल रेवण्णाच्या निवासस्थानी तिसऱ्या मजल्यावरील खोलीत अनेक महिलांवर अत्याचार झाल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. यासोबत काही घटनांचा व्हिडीओही जोडला गेला आहे. पीडितांपैकी अनेक महिला या प्रज्ज्वल रेवण्णापेक्षाही मोठ्या वयाच्या आहेत. आता दोषी मानले गेलेल्या प्रकरणातील महिलेचे वय ४७ असल्याचे सांगितले जाते.

‘रेड सॉइल स्टोरीज’ युट्यूब चॅनेलच्या शिरीष गवसचा दुःखद मृत्यू; वर्षभरापूर्वीच झाला होता बाबा