-
आर. जी. कर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेला एक वर्ष झाले, त्यानिमित्ताने कोलकात्याच्या श्याम बाजारमध्ये डॉक्टरांसह आंदोलनकर्त्यांनी रात्रभर मेणबत्त्या पेटवत जागरण केले आणि भित्तिचित्राभोवती जमून श्रद्धांजली वाहिली. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
हावड्याच्या सॅन्ट्रागाछीत आंदोलनकर्त्यांनी नबान्याकडे कूच करताना बॅरिकेड्स चढून संताप व्यक्त केला. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
कोलकात्यात भाजपाने आयोजित केलेल्या आंदोलनात एका व्यक्तीने बांगड्या व राख्या दाखवत रोष व्यक्त केला. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
कोलकात्यात आंदोलनादरम्यान भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
हावड्यात नबान्याकडे कूच करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या लोखंडी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
कोलकात्यात भाजपा नेते व विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभाग घेतला. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
हावड्यात आंदोलनकर्त्यांनी आर. जी. कर हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर संताप व्यक्त करत नबान्याकडे मोर्चा काढला. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
कोलकात्यात रात्रीच्या जागरणादरम्यान एका आंदोलकाने पोलिस अधिकाऱ्याला राखी बांधली. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
कॉलेज स्ट्रीट ते श्याम बाजारदरम्यान कनिष्ठ डॉक्टर व वरिष्ठ डॉक्टरांनी मशाल मोर्चा काढला. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
राज्यसरकारी आर. जी. कर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलसमोर कनिष्ठ डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर व आंदोलनकर्त्यांनी मशाल मोर्चा काढला. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”