-
Independence Day 2025 : भारत आज (१५ ऑगस्ट) आपला ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. यानिमित्त राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. त्यानंतर मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले, “आज भारतभर आपल्या मातृभूमीचं जयगान गायलं जातं आहे. १९४७ मध्ये अनेक शक्यतांसह, कोटी कोटी भुजांच्या सामर्थ्याने आपला देश स्वतंत्र झाला. देशाच्या आशा अपेक्षा उड्डाण घेत होत्या, मात्र आव्हानं प्रचंड प्रमाणात होती.” (PC : Narendra Modi/X)
-
खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार!
या भाषणावेळी मोदी यांनी एक मोठी घोषणा केली. ‘पंतप्रधान विकसित भारत योजना’ या नावाची एक नवी योजना केंद्र सरकारने सुरू केल्याचं मोदी यांनी जाहीर केलं. या योजनेअंतर्गत तब्बल ३.५ कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जातील, असं मोदी म्हणाले. तसेच खासगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना सरकारकडून १५,००० रुपये दिले जातील, अशी घोषणा देखील मोदी यांनी यावेळी केली. (PC : Narendra Modi/X) -
जीएसटीत कपात होण्याची शक्यता
पंतप्रधान मोदी म्हणाले, यंदाच्या दिवाळीत तुम्हाला एक मोठी भेट मिळणार आहे. आम्ही सलग ८ वर्षे जीएसटी कमी करण्यासाठी काम केलं आहे. आम्ही पुढच्या पिढीच्या जीएसटीवर काम करत आहोत आणि या दिवाळीत आपण खरेदी केलेल्या आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू खूप स्वस्त होतील. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.(PC : Narendra Modi/X) -
भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवणार : मोदी
२०४७ पर्यंत आपल्याला भारताला विकसित राष्ट्र बनवायचं आहे. त्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असून त्या योग्यरित्या अंमलात आणण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केल्याची घोषणा मोदी यांनी यावेळी केली. (PC : Narendra Modi/X) -
न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही : मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, शत्रूकडून होणारं न्यूक्लिअर ब्लॅकमेल (अणूबॉम्ब टाकण्याची धमकी) कधीही सहन करणार नाही. दहशतवाद माजवणारे आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांकडे एकाच चष्म्यातून पाहिलं जाईल. तसंच सैन्य दलांना त्यांच्याविरोधात कारवाईची खुली सूट असेल. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग आजवर खूप सहन केलं, आता अजिबात सहन करणार नाही. (PC : Narendra Modi/X) -
सिंधू जलकरारावरून आदळआपट करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान मोदींचं उत्तर
मोदी यांनी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला इशारा दिला की “यापुढे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही.” याचाच अर्थ पाकिस्तान सीमेवरून भारताविरोधातील कुरापती थांबवणार नाही तोवर सिंधू जलकरार स्थगितच राहणार आहे. सिंधू जलकरार आपल्यासाठी किती अन्यायकारक आहे. हा करार खूपच एकतर्फी आहे. भारतात उगम पावणाऱ्या नद्यांच्या पाण्यावर आपल्या शत्रू देशातील शेतकरी पिकं काढतोय आणि माझ्या देशातील शेतकरी मात्र दुष्काळाचा सामना करतोय. माझ्या देशातील जमीन तहानलेली आहे. सात दशकांपासून त्या अन्यायकारक कराराने आमचं पाणी पळवलं. परंतु, भारत आता हे सगळं सहन करणार नाही. (PC : Narendra Modi/X) -
२०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वांच्या स्थळांना सुरक्षा कवच देणार : पंतप्रधान मोदी
मोदी म्हणाले, पुढील १० वर्षांत म्हणजेच २०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वपूर्ण स्थळे ज्यामध्ये सामरिक ठिकाणांसह सिव्हीलीयन स्थळे जसे की रुग्णालये, रेल्वे व धार्मिक ठिकाणी तंत्रज्ञानाच्या नव्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने सुरक्षा कवच दिले जाईल. यासाठी भगवान श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेत, त्यांच्या सुदर्शन चक्राचा मार्ग निवडला आहे. देश मिशन सुदर्शन चक्र लाँच करेल.हे सुदर्शन चक्र पॉवरफुल वेपन सिस्टम असेल, जे शत्रूचे हल्ले नष्ट तर करेलच याबरोबरच अनेक पटीने शत्रूंवर वार देखील करेल. (PC : Narendra Modi/X) -
मेड इन इंडिया जेट इंजिन बनवण्याचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण शास्त्रज्ञ, अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुण व शासकीय विभागांना आवाहन केलं की आपल्या मेड इन इंडिया फायटर जेटसाठीचं इंजिनही आपलं स्वतःचं असलं पाहिजे. (PC : Narendra Modi/X) -
वर्षाच्या अखेरपर्यंत ‘मेड इंन इंडिया’ चीप बाजारात दाखल होणार – पंतप्रधान मोदी
पंतप्रधा म्हणाले, “आपल्या सरकारने सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी काम सुरू केले आहे. सहा वेगवेगळे सेमीकंडक्टरचे युनिट्स तयार होत आहेत. चार नव्या युनिट्सना ग्रीन सिग्नल दिला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ‘मेड इन इंडिया’ चिप बाजारात दाखल होईल.” (PC : Narendra Modi/X) -
स्वदेशीचा वापर सक्ती म्हणून नाही तर ताकदीसाठी करू : मोदी
या देशात तयार होणाऱ्या वस्तू आपण खरेदी केल्या तर त्यातून भारत समृद्ध होईल. देशातील व्यापाऱ्यांनी देखील स्वदेशी वस्तू विकल्या पाहिजेत व विकत घेतल्या पाहिजेत. तसे फलकही आपल्या दुकानांबाहेर लावले पाहिजेत. (PC : Narendra Modi/X) -
शेतकरी आणि मासेमारी करणाऱ्यांच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही : पंतप्रधान
मोदी म्हणाले, भारतीयांनी ‘व्होकल फॉर लोकल’हा नवा मंत्र आत्मसात करावा. भारतीयांनी स्वदेशी वस्तुंच्या खरेदीचा आग्रह धरावा. मेड-इन-इंडिया फायटर जेट भारतात बनू शकत नाही का?, भारताचं धन भारतातच राहावं, परदेशात का जावं? भारतीय कंपन्यांनी भारतातच खतं बनवावी,आय, केलेलं खत नको. महत्वाच्या खनिजांत आत्मनिर्भरता आणू.(PC : Narendra Modi/X)

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा