-
देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी २०१४ ला विराजमान झाले. त्यानंतर त्यांनी सलग तीन कार्यकाळ मोदी पंतप्रधान आहेत. १५ ऑगस्ट २०१४ या दिवशी त्यांनी ६५ मिनिटं भाषण केलं. (सर्व फोटो सौजन्य-ANI )
-
२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पिवळ्या रंगाचा बांधणीचा फेटा बांधला होता आणि झब्बा पायजमा परिधान केला होता. २०१५ ला मोदींनी केलेलं संबोधन ८८ मिनिटांचं होतं.
-
२०१६ च्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पांढरा कुर्ता पायजमा आणि गुलाबी तसंच पिवळा रंग समाविष्ट असलेला फेटा असा वेश परिधान करुन आले होते. या दिवशी त्यांनी ९६ मिनिटं संबोधन केलं.
-
२०१७ च्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा तसंच पिवळ्या रंगाचा फेटा परिधान केला होता. या वर्षी त्यांनी ५७ मिनिटं भाषण केलं.
-
२०१८ मध्ये झब्बा पायजमा आणि भगवा आणि लाल यांची रंगसंगती असलेला फेटा त्यांनी परिधान केला होता. या वर्षी मोदींनी स्वातंत्र्य दिनी ८२ मिनिटांचं संबोधन केलं.
-
२०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ९२ मिनिटं भाषण केलं होतं. या वर्षीचा त्यांचा पोशाखही आकर्षक होता
-
२०२० मध्ये देशावर करोनाचं संकट होतं. त्यामुळे मोदींनी त्याबाबत आपण आत्मनिर्भर कसं झालं पाहिजे यावर भाष्य केलं होतं. त्यावेळी त्यांचा भाषणाचा कालावधी हा ८६ मिनिटं होता.
-
२०२१ मध्येही करोनाची दुसरी लाट होती. दरम्यान या वर्षी आलेल्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पांढरा कुर्ता, पायजमा, निळं जॅकेट आणि गुलाबी तसंच लाल रंगसंगती असलेला फेटा परिधान करुन आले होते. या वर्षी त्यांनी ८८ मिनिटं भाषण केलं होतं.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२२ मध्ये लाल किल्ल्यावरुन जे भाषण केलं त्याचा कालावधी ८३ मिनिटं होता.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मधल्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन ९० मिनिटांचं भाषण केलं.
-
मागील वर्षी म्हणजेच २०२४ च्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९८ मिनिटं भाषण केलं. २०२४ मध्ये मोदींची तिसरी टर्म सुरु झाली आहे.
-
मागील सर्व वर्षांचा रेकॉर्ड मोदींनी या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये मोडला. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १०३ मिनिटांचं भाषण केलं.

Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…