-
१४ ऑगस्ट २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यातील चासोती (Chasoti) गावात ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे माचैल माता यात्रा मार्गावर अचानक पूर आला, ज्यामुळे भाविकांनी भरलेल्या बाजारपेठा, सामुदायिक स्वयंपाकघरे आणि सुरक्षा चौक्या उद्ध्वस्त झाल्या. सुरुवातीच्या बचाव कार्यात किमान ६० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी आणि शेकडो अजूनही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. ही आपत्ती माचैल माता मंदिरातील वार्षिक यात्रेसाठी मोठ्या संख्येने लोक जमले असताना झाली. अधिकाऱ्यांनी तातडीने तीर्थयात्रा स्थगित केली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू केले. (फोटो पीटीआय)
-
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटी झाल्यानंतर प्रभावित भागात ढिगाऱ्यांमध्ये उभे असलेले लोक. (फोटो पीटीआय)
-
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीमुळे झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारी एक महिला. (फोटो पीटीआय)
-
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीनंतर बाधित भागात वाहनांचे ढिगारे आणि अवशेष पाहायला मिळाले. (फोटो पीटीआय)
-
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटी झाल्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. (फोटो पीटीआय)
-
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटी झाल्यानंतर एका बाधित भागात सुरक्षा कर्मचारी पहारा देताना. (फोटो पीटीआय)
-
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटी झाल्यानंतर बचावकार्य सुरू असतानाचे एक छायाचित्र. (फोटो पीटीआय)
-
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीमुळे बाधित भागात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले. (फोटो पीटीआय)
-
ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या वाहनांजवळ आणि ढिगाऱ्याजवळ उभे असलेले स्थानिक लोक. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
ढगफुटीच्यानंतर इमारतींचे घरे, रस्ते, इमारती यांचे प्रचंड नुकसान झाले असून अशाच एका नुकसानग्रस्त भागातील इमारती दाखवताना नागरिक. (फोटो पीटीआय)
-
किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीनंतर बाधित भागात बचावकार्य सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत किमान ६०जणांचा मृत्यू झाला आहे आणि १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. (फोटो पीटीआय)

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…