-
Kokan Nagar Govinda Pathak 10 Thar: ‘गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा जयघोष सध्या मुंबईसह, ठाणे आणि उपनगरांमध्ये पाहायला मिळत आहे.
-
दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे.
-
कोकणनगर गोविंदा पथकाने (Kokan Nagar Govinda Pathak) वर्तकनगर येथील मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे (Sanskruti Yuva Pratishthan) आयोजित दहीहंडी उत्सवात १० थर लावून विश्वविक्रम केला.
-
या विक्रमानंतर मंत्री सरनाईक यांनी मंडळाला २५ लाखांचे पारितोषिक जाहीर करताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जयघोष सुरू केला.
-
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे वर्तकनगर येथील मैदानात दहीहंडी उत्सव उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. या मंडळांकडून दरवर्षी प्रमाणे लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
-
यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखांचे बक्षीस तसेच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येईल.
-
याशिवाय, जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास २५ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
-
यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास ५० वर्षे पूर्ण झाली, या निमित संस्कृती दहीहंडी उत्सव ‘शोले’ चित्रपटाचा ‘सुवर्ण महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे.
-
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, ‘मी पारितोषिक आधीच जाहीर केले होते. कोकण नगर मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने त्यांनी राष्ट्रभक्ती दाखवली, कोणी कितीही काही म्हणून द्या, तुम्ही मराठी एकी दाखवली. मी या पथकाला २५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करतो.’

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…