-
Smart Meter: महावितरणतर्फे अत्याधुनिक स्मार्ट मीटर (टाइम ऑफ डे) लघुदाब वीज ग्राहकांच्या घरी बसवले जात आहेत.
-
या मीटरच्या माध्यमातून कोणत्या वेळेला किती वीज वापर होतोय, याची अचूक माहिती संबंधित ग्राहक व महावितरणला मिळणार आहे.
-
या मीटरचा कोणताही आर्थिक भार ग्राहकांवर पडणार नाही. हे मीटर वीज ग्राहकांच्या फायद्याचेच असून या मीटरबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
-
स्मार्ट मीटर (टीओडी) मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते मीटर महावितरणच्या सर्व्हरला जोडले आहे. त्यामुळे मीटरमधील वीज वापराची अचूक माहिती महावितरणकडे उपलब्ध होते.
-
स्मार्ट मीटर (टीओडी) मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते मीटर महावितरणच्या सर्व्हरला जोडले आहे. त्यामुळे मीटरमधील वीज वापराची अचूक माहिती महावितरणकडे उपलब्ध होते.
-
मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती तात्काळ महावितरण, ग्राहकाला मिळू शकेल.
-
मीटरचे वाचन स्वयंचलित होणार आहे. यात मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नाही.
-
स्वयंचलित मीटर वाचनामुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. हे अत्याधुनिक मीटर असल्याने यात ग्राहकाला प्रत्येक तासाचा, दिवसाचा वीजवापर मोबाईलवर पाहता येइल.
-
मीटर बसवण्यासाठी ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नसून केंद्र सरकारच्या निधीतून सवलत देण्यात येत आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
-
राज्यातील अनेक ग्राहकांकडून महावितरणकडे ‘स्मार्ट मीटर’ला आमचा विरोध असून ते लावू नये असे अर्जही संबंधित महावितरण कंपनीकडे दिले गेले आहे. त्यानंतरही राज्यात कंत्राटदार कंपनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हे मीटर लावत आहे.

‘इंडिया’चा उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरला, खरगेंकडून सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या नावाची घोषणा