-
अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ बांधण्यात येणाऱ्या चीनच्या जगातल्या सर्वात मोठ्या धरणाचा फटका भारत व बांगलादेशला बसणार आहे हे स्पष्ट होत आहे. (प्रतिकात्मक फोटो)
-
अलिकडेच अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या धरणाला ‘वॉटर बॉम्ब’ म्हटले आहे. या धरणाची निर्मिती ही आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण करणार आहे असं मतही त्यांनी मांडलं. (प्रतिकात्मक/एआय फोटो)
-
या धरणाचं बांधकाम व परिणामांबाबत सुरुवातीपासूनच चिंता व्यक्त करण्यात आली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये तिबेटमधल्या यारलुंग त्सांगपो नदीवर हे धरण बांधण्यासाठी चीनने हिरवा कंदील दाखवला आहे. चीनला यामाध्यमातून जलविद्युत प्रकल्प राबवायचे आहेत. (प्रतिकात्मक/एआय फोटो)
-
या प्रस्तावित धरणामुळे चीनला भारतात प्रवेश करणाऱ्या व आसाम, बांगलादेशमधून वाहणाऱ्या सीमापार नदिचा प्रवाह नियंत्रित करता येणं शक्य होणार आहे. (प्रतिकात्मक/एआय फोटो)
-
यावर भारताचं उत्तर काय आहे?
भारत पाक युद्धांदरम्यान, नेहमीच पाकिस्तानच्या बाजून उभे राहणाऱ्या चीनच्या या मेगा धरणामुळे भारताचं काहीही नुकसान होऊ नये यासाठी भारतही आता अरुणाचल प्रदेशात सर्वात मोठे धरण बांधण्याची तयारी करत आहे. या धरणाची साठवणूक क्षमता १४ अब्ज घनमीटर (बीसीएम) असणार आहे. (प्रतिकात्मक/एआय फोटो) -
बैठका
सियांग नदीवर प्रस्तावित असणारा हा एक मोठा जलविद्युत प्रकल्प असणार आहे. या धरणाच्या बांधकामाला गती देण्याच्या उद्देशाने भारतीय अधिकाऱ्यांच्या बैठका वाढत आहेत. पण त्याच्या दुसऱ्या बाजूला अरुणाचलमधल्या नागरिकांनी पुराच्या भीतीमुळं ११.२ गिगावॅटच्या या जलविद्युत प्रकल्पाला विरोध केला असल्याचे पाहायला मिळते आहे. (प्रतिकात्मक/एआय फोटो) -
दरम्यान, चीनच्या धरणामुळं उन्हाळ्यामध्ये नदीतला पाण्याचा प्रवाह ८५ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची भीती भारताला आहे. तसेच भारत सरकारच्या एका रिपोर्टनुसार देशानं प्रस्तावित केलेलं धरण जलदगतीने पूर्ण करण्याच्या सुचना जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ४ सुत्रांच्या हवाल्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिली आहे. (प्रतिकात्मक/एआय फोटो)
-
दरम्यान, चीन, भारत आणि बांगलादेशमधील १० कोटींहून अधिक लोकांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तिबेटच्या अंग्सी ग्लेशियरमधून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकार २००० सालापासूनच प्रकल्प राबवण्याचा विचार करत होतं. (प्रतिकात्मक/एआय फोटो)
-
पण, अरुणाचल प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील रहिवाशांकडून होणाऱ्या तीव्र आणि हिंसक विरोधामुळे या प्रकल्पांना अडथळा निर्माण होत गेला. तिथल्या नागरिकांना भीती आहे की कुठेही धरण बांधले गेले तर त्यांची गावं पाण्याखाली जातील आणि त्यांच्या जीवीताला धोका निर्माण होईल. (प्रतिकात्मक/एआय फोटो) हेही पाहा- सहारा ते ड्रीम ११; भारतीय क्रिकेट संघाची जर्सी दुर्दैवी आहे का? प्रायोजकांना आल्या आर्थिक अडचणी, स्पॉन्सरशिपचा इतिहास काय?

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय