-
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईत पोहचले आहेत. तसंच मराठा बांधवही मोठ्या संख्येने मुंबईत आले आहेत. (सर्व फोटो-आकाश पाटील, इंडियन एक्स्प्रेस)
-
भगवे झेंडे घेऊन, भगव्या टोप्या घालून मराठा बांधव प्रचंड संख्येने आझाद मैदानात दाखल झाले आहेत.
-
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे शुक्रवारी सकाळी मुंबईत पोहोचले आहे.
-
जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून मराठा समाजाचे लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
मराठा आंदोलक रस्त्यावर आल्याने मोठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलनकर्ते रस्त्यावर बसले आहेत.
-
आझाद मैदानात आंदोलन असल्याने फ्री वे टाळा अशी सूचनाही वाहतूक पोलिसांनी मुंबईकरांना दिली आहे. सामान्य मुंबईकरांना या गर्दीचा सामना करावा लागतो आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. कोणकोणत्या मार्गावर वाहतूक बंद असेल, पर्यायी मार्ग कोणते वापरावेत यासंदर्भात ट्विट करत सूचना देण्यात आल्या आहेत.
-
मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर आझाद मैदान आणि सीेएसएमटी परिसरात दाखल झाले आहेत. झेंडा उंचावून दाखवताना मराठा बांधव
-
सीएसएमटीचा परिसर, मुंबई महानगरपालिकेचा भाग, आझाद मैदान आणि वाडी बंदर परिसरात हजारो मराठा आंदोलक उपस्थित आहेत. सगळा परिसर भगव्या गर्दीने फुलून गेला आहे.
-
मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर मुंबईत आल्याने ऑफिस गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रॅफिक आणि गर्दीचा सामना करावा लागतो आहे.
-
छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणी मराठा बांधवांची झालेली गर्दी

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”