घुमान येथे सुरु झालेल्या साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष अतिथी म्हणून तर पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबिरसिंह बादल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, संमेलनात मराठी कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. (छाया- अरविंद तेलकर)