-
मोठी स्टारकास्ट आणि धमाल मनोरंजन असलेला ‘वेलकम जिंदगी’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून ‘वेलकम जिंदगी’ सिनेमाचं फर्स्ट लूक लॉन्च हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा-कथा लेखक आणि दबंग सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या उपस्थितीत हनी छाया यांच्या हस्ते करण्यात आले.
-
यावेळी सिनेमातील स्टारकास्टच्या आणि मराठी सिने इंडस्ट्रीतील मान्यवरांची उपस्थिती होती.
-
यावेळी भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांचं सिनेमाविषयीचं पॅशन दाखवणारा एक व्हिडीओ दाखवण्यात आला आहे. भारतीय सिनेसृष्टीचं हे १०२ वर्ष साजरं करण्यात येत आहे यानिमित्ताने हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
-
या सिनेमातून सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि अमॄता खानविलकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे. येत्या २६ जून रोजी हा सिनेमा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
वेलकम जिंदगीच्या म्युझिक लॉन्चला स्वप्निल मैत्रीण आणि मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरही उपस्थित होती.
-
सई ताम्हणकर

सलीम खान यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, “मी आणि जावेद अख्तर नॅरेशनमध्ये चांगले होतो. पण कथा लिहिण्यात आमची बोंब होती. तर १९७५ पासून हनी छाया यानी आमच्या नॅरेडेट स्टोरीज त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिल्या आहेत. त्यांचा मुलगा बीभास छाया याने सुद्धा आमच्यासाठी काम आजही काम करत आहे. जो या सिनेमाच्या निर्मात्यांपैकी एक आहे. त्यामुळॆ या सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्याचा मान मी माझ्याऎवजी हनी छाया यांना देतो आहे”. -
वेलकम जिंदगीचा म्युझिक लॉन्च सोहळा.

स्वप्नील जोशी म्हणाला की, ” मी याआधी अनेक फिल्म माझे करीअर म्हणून केल्यात पण हा सिनेमा मी माझ्या स्वत:च्या सॅटीसफॅक्शनसाठी करतो आहे. या सिनेमातील माझं आनंद प्रभू हे कॅरेक्टर जीवनाकडे सकारात्मक बघणारं आणि जीवनाचा प्रत्येक क्षण जगणारं आहे. तसेच या सिनेमाला एक वेगळाच लूक देण्याचं क्रेडीट सिनेमाचा दिग्दर्शक उमेश घाडगे याला जातं”. -
दिग्दर्शक उमेश घाडगे यांनी ‘वेलकम जिंदगी’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
-
सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी कॅमे-यास पोज देताना.
-
‘वेलकम जिंदगी’ सिनेमात स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, डॉ.मोहन आगाशे, मुरली शर्मा, भारती आचरेकर, राजेश्वरी सचदेव, प्रशांत दामले, उर्मिला कानेटकर, पुष्कर श्रोत्री, विवेक लागू, सतिश आळेकर आणि जयंत वाडकर अशी लोकप्रिय कलाकारांची भलीमोठी यादी आहे.

सिनेमाचे लेखन गणेश मतकरी यांनी केलं आहे. आता इतकी मोठी स्टारकास्ट आणि गणेश मतकरी यांच्यासारख्या प्रतिभावंत लेखकाने सिनेमाचे लेखन केले आहे, याने आणखीनच सिनेमाची उत्सुकता वाढणार आहे. -
सलीम खान
-
मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि लोकप्रिय अभिनेत्री अमॄता खानविलकर हे दोघे या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहेत. त्यामुळे या सिनेमाची रंगत ह्या गोडजोडीने वाढणार आहे. दोघांची अभिनयाची जुगलबंदी बघण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकताही वाढली आहे
-
उमेश घाडगे आणि स्वप्निल जोशी कॅमे-यास पोज देताना.
-
सिनेमाला अमित राज, पंकज पडघन, शामीर टंडन, सौमिल आणि सिद्धांत या संगीतकरांनी संगीत दिले आहे तर सिनेमाची गीते गुरू ठाकूर, ओमकार मंगेश दत्त, मंदार चोळकर, वरूण लिखाते यांनी लिहिली आहेत.

येत्या २६ जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तर सिनेमाची सिनेमटोग्राफी प्रसाद भेंडे यांनी केलीये . -
-
-
-
-
एक,दोन नाहीतर तब्बल ७ वर्ष येणार मोठी संकटं; ‘या’ राशीच्या मागे असणार कडक शनि साडेसाती, नोकरी, संपत्ती, आरोग्याची हानी