-
काळबादेवी परिसरात एका जुन्या इमारतीला शनिवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीच्या बचावकार्यादरम्यान अग्निशमनदलाचे दोन अधिकारी शहीद झाले असून, आगीमध्ये होरपळल्यामुळे दोन अधिकाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. अग्निशमनदलाचे संजय राणे आणि महेंद्र देसाई हे दोन अधिकाऱी आगीमध्ये होरपळल्यामुळे मृत्युमुखी पडले. (छाया: गणेश शिर्सेकर)

उच्च न्यायालयाने पॅरोल मंजूर केल्यामुळे कुख्यात गुंड अरूण गवळी याला शनिवारी मुलाच्या लग्नास उपस्थित राहता आहे. (छाया: गणेश शिर्सेकर) -
रविंद्रनाथ टागोर यांच्या १५४व्या जयंती निमित्त शनिवारी कोलकात्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या लहानगिने देखील रविंद्रनाथ टागोर यांना अभिवादन केले. (छाया: पीटीआय)
-
मॉस्कोमध्ये दुसऱ्या महायुध्दाच्या ७०व्या विजय स्मृतीदिना निमित्त शनिवारी विजय दिवस साजरा करण्यात आला. या संचलनामध्ये भारतीय सैन्याच्या तुकडीने देखील भाग घेतला. (छाया: पीटीआय)
“आम्ही दोन दिवस तिथे…”, सलमान खानच्या फार्महाऊसवर राहिलेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य