-
महिलांच्या मनातील गोष्टी ऐकू येणाऱ्या ‘अगं बाई अरेच्च्या’ या वेगळ्या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पाच इंद्रियांपैकी एक असणारा स्पर्श आणि यातुन उलगडणारा ‘अगं बाई अरेच्चा भाग २’ हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट येत्या २२ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
-
पहिल्या चित्रपटात अभिनेत्याला बायकांच्या मनात काय चालले हे ऐकू येत असे. यावेळी, आपल्या मनातील भावना प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दापेक्षाही परिणामकारक ठरणारा स्पर्श हा चित्रपटाचा विषय घेण्यात आला आहे
-
यात स्पर्धाविना फुलणाऱ्या प्रेम कहाणीतील गंमत आणि हळुवारपणा या कथेतून व संगीतातून मांडला आहे.
-
चित्रपटात लहानपणापासून ते मोठी होईपर्यंत शुभदाच्या आयुष्यात सहा पुरुष येतात.
-
चित्रपटाची कथा ज्येष्ठअभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर आणि केद्रार शिंदे यांची आहे.
-
चित्रपटाचा पूर्वार्ध दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवरून घेण्यात आला असून उत्तरार्ध केदार शिंदे यांनी रंगविला आहे
-
इरॉस इंटरनॅशनल प्रस्तुत व अनुष्का मोशन फिक्चर्स अँड एन्टरटेंमेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन निर्मित ‘अंग बाई अरेच्चा -२’ या चित्रपटाचे नरेंद्र फिरोदिया , सुनील लुल्ला निर्माते असून बेला शिंदे सहनिर्मात्या आहेत.
-
यात सोनाली कुलकर्णी, सुरभी हांडे, धरम गोहिल, मिलिंद फाटक, माधव देवचक्के, भरत जाधव, प्रसाद ओक, सिध्दार्थ जाधव यांच्या भूमिका आहेत
-
केदार शिंदे दिग्दर्शित ‘अग बाई अरेच्चा २’ हा सिनेमा २२ मे रोजी प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.
-
सोनाली या चित्रपटात सहा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये दिसणार आहे.
-
या चित्रपटात तिने ‘शुभांगीची’ व्यक्तिरेखा साकारली असून तिची मनोवस्था सारखी बदलत असते.
-
बदलत्या मनोवस्थेमुळे ती आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पुरुषांच्या प्रेमात पडते.
-
या चित्रपटासाठी तिनं तब्बल तेरा किलो वजन कमी केलं.
-
आनंदी, दुःखी, गोंधळलेली असे विविध भाव या व्यक्तिरेखेमध्ये सामावले आहेत.

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक