-
मुंबईतील आझाद मैदान येथे मंगळवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख नेते सीताराम येचुरी यांनी आदिवासी मोर्चाला मार्गदर्शन केले. (छाया- प्रशांत नाडकर)
-
एकापेक्षा एक दिग्गज मागदर्शकांचा मोठा ताफा असलेल्या मुंबई इंडियन्सने रडत-खडत खेळत साखळीच्या अखेरच्या सामन्यात बाद फेरीचा टप्पा गाठला. मात्र वानखेडे स्टेडियमवर ‘क्वॉलिफायर-१’मध्ये स्वप्नवत कामगिरीचा नजराणा पेश करीत मुंबईने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जला २५ धावांनी पराभूत केले आणि आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा स्थान मिळवले आहे. (छाया- पीटीआय)
-
देशातील सर्वात स्वस्त प्रवासी कार म्हणून सादर करण्यात आलेल्या टाटा मोटर्सच्या नॅनोचे नवे रूप मंगळवारी मुंबईत समोर आले. जेनएक्स नॅनो नावांतर्गत या कारची किंमत २.१९ लाख रुपयांपुढे आहे. एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सएमए, एक्सटीए या पाच प्रकारांत ती उपलब्ध आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)

विकासाचे शहर असलेल्या नवी मुंबई शहर परिसरात २४ तास पाणीपुरवठा सुरू असताना येथील ग्रामीण भागात आजही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. खारघर येथील ओवे गावातही तशी परिस्थिती निर्माण झाली असून कोयना प्रकल्प ग्रस्त असलेल्या येथील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. (छाया – नरेंद्र वास्कर)
५०० वर्षानंतर शनीदेव अन् गुरू देणार पैसाच पैसा! २०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींना दुपटीने मिळणार धन-संपत्ती; अखेर श्रीमंतीचे दिवस सुरू…