-
भारतीय हवाई दलाचे मिराज २००० हे लढाऊ विमान गुरुवारी पहाटे उत्तर प्रदेशात मथुरेजवळ यमुना द्रुतगती महामार्गावर उतरले तेव्हा पांथस्थांना आश्चर्याचा धक्काच बसला. पण हे अनपेक्षित नव्हे तर पूर्वनियोजित विमानावतरण होते. युद्ध काळात वा आणीबाणीच्या परिस्थितीत वायुदलाचे विमान रस्त्यावर उतरवता येईल का, याची ही चाचणी होती आणि ती यशस्वी झाली. अर्थात भाजपच्या वर्षपूर्ती समारंभानिमित्त पंतप्रधान मोदी सोमवारी मथुरेत येत आहेत, हा एक योगायोग
-
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २४व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी नवी दिल्लीत वीरभूमी या त्यांच्या स्मृतीस्थळावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका वढेरा यांनी आदरांजली वाहिली.

उन्हापासून थोडा वेळ थंडावा मिळावा म्हणून गजराजांना साबरमती नदीमध्ये आंघोळ घालताना माहूत. (छायाः पीटीआय) 
राचीच्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या रॉयल चॅलेंजर बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीचा फोटो काढण्यास लोकांची झुंबड उडाली होती. (छायाः पीटीआय) 
ठाणे रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. -
ठाणे रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील ओव्हरहेड वायर तुटल्याने अप आणि डाऊन अशा दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला.
-
ठाणे, कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला असून सर्व प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक गर्दीने फुलून गेले. (छाया – दीपक दामले)
५०० वर्षानंतर शनीदेव अन् गुरू देणार पैसाच पैसा! २०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींना दुपटीने मिळणार धन-संपत्ती; अखेर श्रीमंतीचे दिवस सुरू…