-
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. गेल्या वर्षीचा विक्रम मोडीत काढत या वर्षी निकाल वाढला आहे. या वर्षी राज्यातील ९१.२६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर गेल्या वर्षी ही टक्केवारी ९०.०३ अशी होती. (छाया- दिपक जोशी)
-
मुंबईतील मरिनड्राईव्ह येथील समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आलेली ही मंडळी. डोक्यावरील वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या आणि त्यांची छायाचित्र काढून घेण्याची हौस यामुळे या मंडळींनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. (छाया- वसंत प्रभू)
-
रिलायन्स आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे मुंबई येथे उद्यान आणि गाड्यांच्या पार्किंगसाठी जिओ गार्डन तयार करण्यात आले आहे. बुधवारी या उद्यानाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, नीता अंबानी, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर उपस्थित होते. (छाया- केविन डिसोझा)
-
एरव्ही उन्हाने तहानलेले, व्याकुळलेले प्राणी पाण्याच्या शोधात फिरत फिरत येऊन बसलेले दिसतात. पण, केवळ पाणी पिण्यासाठी नाही तर उन्हाने होणारी काहिली शांत करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघोबांनी पाण्यातच बसून विसावा घेतला. (छाया- दिलीप कागडा)
-
नेदरलँडसच्या किंग विल्यम अलेक्झांडर आणि क्वीन मॅक्सिमा या शाही दाम्पत्याचे बुधवारी ओटावा येथील रिदेयू सभागृहात आगमन झाले तेव्हाचे छायाचित्र. (छाया- पीटीआय)
Delhi Red Fort Blast Reddit Post: दिल्ली स्फोटाची शंका ३ तास आधीच १२वीच्या विद्यार्थ्याने व्यक्त केली होती? पोस्टमध्ये म्हणाला होता, “काहीतरी घडतंय का?”