-
म्हैसूरच्या वडियार राजघराण्याला अखेर नवा वारसदार मिळाला असून राणी प्रमोदादेवी यांनी दत्तक घेतलेल्या यदुवीर यांचा गुरूवारी राज्याभिषेक करण्यात आला.
-
म्हैसूर राजवाडय़ाच्या कल्यान मंडपमध्ये हा सोहळा पार पडला. राजे यदुवीर हे २३ वर्षांचे असून राणी प्रमोदादेवी यांच्या घराण्यातील आहेत.
-
वंगत राजा श्रीकांतदत्त वडियार यांना अपत्य नसल्याने त्यांच्या निधनानंतर कर्नाटक सरकारने म्हैसूर राजघराण्याच्या मालमत्तेवर हक्क सांगितला होता.
-
हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. म्हैसूरमध्ये दसरा महोत्सवाला मोठा इतिहास आहे.
-
तो १६१० सालापासून साजरा केला जातो. दोन वर्षांपूर्वी श्रीकांतदत्त वडियार यांचे निधन झाल्यानंतर प्रथमच राजाशिवाय दसरा महोत्सव साजरा करण्यात आला.
-
दुवीर यांचा राज्याभिषेक झाल्याने वडियार घराण्याला राज्य सरकारसोबत कायदेशीर लढाई लढणे सोपे होणार आहे.
-
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने पोस्ट करून दिली माहिती