
दाक्षिणात्य चित्रपटातून हल्ली बॉलीवूडचे दिग्दर्शक प्रेरणा घेताना दिसत आहेत. अनेक बॉलीवूड चित्रपटांचे प्रादेशिक भाषांमध्ये रिमेक करण्यात आले आहेत. मात्र, आता चित्र उलटले असून, बॉलीवूड दिग्दर्शकचं दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक करताना दिसतायतं. असेच काही दाक्षिणात्य चित्रपटातून रिमेक झालेले बॉलीवूड चित्रपटांवर नजर टाकूया. 
‘पपानासम’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक असलेला ‘दृश्यम’ गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला. यात अजय देवगण, श्रिया सरण आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
२०११ साली प्रदर्शित झालेला रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ हा चित्रपट तमिळ चित्रपट ‘सिंघम’चा रिमेक आहे. 
जॉन अब्राहम, जेनेलिया आणि विद्युत जामवाल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘फोर्स’ हा ‘काखन काखा’चा रिमेक आहे. 
आमिरचा गाजलेला चित्रपट ‘गजिनी’ हा ‘गजिनी’ चित्रपटाचा रिमेक आहे. २००८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यावर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. 
सलमानचा ‘वॉण्टेड’ हा चित्रपट ‘पोकिरी’चा रिमेक आहे. 
सलमानचा आणखी एक रिमेक असलेला चित्रपट म्हणजे ‘रेडी’. महेश बाबूच्या ‘रेडी’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. 
अक्षय-सोनाक्षीचा ‘रावडी राठोड’ हा ‘विक्रमारकुदु’चा रिमेक आहे. 
२०११ साली प्रदर्शित झालेला ‘बॉडीगार्ड’ हा तेच नाव असलेल्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाचा रिमेक आहे. 
‘रेहना है तेरे दिल मै’ हा ‘मिन्नाले’चा रिमेक आहे. 
‘सन ऑफ सरदार’ हा ‘मर्यादा रमन्ना’चा रिमेक आहे. 
२००७ साली प्रदर्शित झालेला ‘भूल भूलैय्या’ चित्रपट ‘मनीचित्रथाझू’चा रिमेक आहे. 
शाहरुख खान आणि इरफान खानचा ‘बिल्लू बार्बर’ हा कथा ‘परायुम्पॉल’ चित्रपटाचा रिमेक आहे.
सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…