-
उत्तर प्रदेशातील वृंदावन शहरात अनेक विधवा स्त्रियांना आसरा देण्यात आला आहे. काहीसे अलिप्त जीवन जगणाऱ्या या स्त्रियांच्या आयुष्यात रंगोत्सवाने रंगाच्या माध्यमातून आनंद भरला आहे. सुलभ इंटरनॅशनल संस्थेने २१ मार्च रोजी गोपीनाथ मंदिरात आयोजित केलेल्या रंगोत्सवाच्या कार्यक्रमात या विधवा स्त्रियांनी रंगोत्सव साजरा केला. (सौजन्य – रवी कनोजिया)
-
देशात अनेक विधवा स्त्रिया विरक्त आयुष्य जगताना पाहायला मिळतात. (सौजन्य – रवी कनोजिया)
-
सुलभ इंटरनॅशनल ही सामाजिक संस्था २०१३ पासून दर वर्षी वृदावनमधील विधवा स्त्रियांसाठी होळीचे आयोजन करते. रंग उधळत आनंद व्यक्त करण्यासाठी हजारो विधवा शहरातील जुन्या श्रीकृष्णाच्या मंदिरात जमल्या होत्या. होळी गुरुवारी असली तरी वृंदावन आणि देशातील अन्य काही भागात आठवडाभर आधीच रंगोत्सवास सुरुवात झाली आहे. (सौजन्य – रवी कनोजिया)
-
मंदिरातील पुजाऱ्यांच्या धार्मिक श्लोकांच्या पठणात या महिला रंगाची उधळण करत होळीचा आनंद लुटत होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांचीदेखील उधळण केली. (सौजन्य – रवी कनोजिया)
-
तर काही वृद्ध स्त्रियांना सामाजिक बंधने झुगारण्यास मानसिक बळ मिळत नसल्याने त्यांनी एकमेकींच्या कपाळावर रंगाचा टिळा लावत होळी साजरी केली. (सौजन्य – रवी कनोजिया)
-
वृंदावनमधील या लाखो विधवा स्त्रियांची देखभाल करण्यासाठी संस्थेतर्फे जवळजवळ पंधराशे सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. (सौजन्य – रवी कनोजिया)
-
संस्था त्यांच्या दैनंदिन गरजांची काळजी तर घेतेच, शिवाय त्यांना अत्यावश्यक खर्चासाठी दरमहा दोन हजार रुपये देते. त्यांच्याकडून उदबत्त्या आणि हाराची निर्मिती करून, त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पनातून त्यांना काही प्रमाणात स्वावलंबी बनविण्यावर देखील संस्था भर देते. अनेक स्त्रिया दिवसभर श्रीकृष्णाची भजने गाऊन १० रुपये कमवतात. (सौजन्य – रवी कनोजिया)

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा