-
भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ ला झाला. अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य असून ते भाजपाचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत.
-
अटल बिहारी वाजपेयी भारताचे १० वे पंतप्रधान होते.
-
पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले. – अटल बिहारी वाजपेयी तब्बल दहावेळा लोकसभेवर आणि दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले.
-
वाजपेयींचा पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ फक्त १३ दिवसांचा होता. १९९८ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना झाली. जे सरकार १३ महिने चालले.
-
किशोरवयात असताना त्यांनी स्वातंत्र्यलढढ्यात सहभाग घेतला व ते तुरुंगात गेले.
-
२५ डिसेंबर २०१४ रोजी वाजपेयींच्या जन्मदिनी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींना भारत रत्न पुरस्काराची घोषणा केली. भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
-
वाजपेयींचा जन्मदिवस हा देशात सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो.
-
अत्यंत कसोटीच्या अशा कारगिलच्या युद्धाच्यावेळीही वाजपेयीच पंतप्रधान होते. अत्यंत कसोटीच्या या युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानला अत्यंत प्रतिकूस परिस्थितीत धूळ चारली आणि तेव्हापासून गेल्या 19 वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताविरोधात तशा प्रकारची लढाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही.
-
नवी दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान अटल बिहारी वाजपेयींना लालकृष्ण आडवाणी मिठाई भरवताना..
-
२८-११-८४ रोजी चित्तरंजन पार्क इथल्या निवडणुकीच्या पहिल्या जाहिर सभेत विजय कुमार मल्होत्रा अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी चर्चा करताना..
-
संयुक्त राष्ट्र परिषदेत हिंदीत भाषण देणारे वाजपेयी हे पहिले परराष्ट्र मंत्री होते.
-
सेना भवनजवळ जनतेला अभिवादन करताना वाजपेयी..
-
अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे
-
मुंबईतल्या क्रांती मैदानात वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेही या फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत.
-
गोवा इथल्या भाजप राष्ट्रीय परिषदेत लालकृष्ण आडवाणी, कुशाभाऊ ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी
“मी मुस्लीम आहे त्यामुळे…”, ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याबद्दल अली गोनीची प्रतिक्रिया; म्हणाला, “कुराणमध्ये…”