-
झारखंड विधानसभा निवडणूक निकाल
-
कौल मोदींसाठी नव्हता – प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा फायदा करुन घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असतो. नरेंद्र मोदी कितीही लोकप्रिय असले तरी, राज्याचा विषय येतो, त्यावेळी जनता स्थानिक मुद्दांचा विचार करते. आजच्या निकालातून हेच दिसून आले. लोकसभा आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करताना झारखंडच्या जनतेने वेगवेगळा कौल दिला.
-
मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, ते राज्याचे नेतृत्व करणार नाहीत हा मुद्दा मतदारांनी लक्षात घेतला. त्यामुळेच लोकसभेला १४ पैकी ११ जागा जिंकणाऱ्या भाजपाला विधानसभेला सत्ता गमवावी लागली.
-
रघुवर दास यांचा अहंकार नडला – झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री रघुवर दास यांनी आधीच्या भाजपा सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले होते. २०१४ मध्ये झारखंडमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर नरेंद्र मोदी-अमित शाह यांनी रघुवर दास यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली.
-
सत्ता मिळाल्यामुळे रघुवर दास यांना मोठी संधी मिळाली होती. पण रघुवर दास यांच्या डोक्यात सत्ता गेली अशी झारखंडच्या जनतेची तक्रार होती. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. रघुवर दास यांच्या अहंकारी स्वभावाचा पक्षाला फटका बसला हे झारखंडमधील भाजपाचे नेतेही मान्य करतात.
-
आदिवासींचा संताप – शिबू सोरेन यांच्यासारख्या नेत्यांच्या आंदोलनानंतर २००० साली झारखंडची आदिवासी राज्य म्हणून स्थापना झाली. या राज्यात आदिवासी मते आता एक तृतीयांशपेक्षा कमी असली तरी, झारखंड आजही भावनिक दृष्टया आदिवासी राज्य आहे. रघुवर दास यांचे सरकार आदिवासी विरोधी असल्याची प्रतिमा निर्माण झाली होती.
-
लिंचिंग – मुस्लिम आणि दलितांविरोधात मॉब लिचिंगच्या घटना घडल्या. गोरक्षकांकडून हे हल्ले करण्यात आले.
-
मागच्या दोन वर्षात मॉब लिंचिंगमुळे झारखंडमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. त्यात ११ मुस्लिम होते. सरकार गोरक्षकांकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी फारसे गंभीर नाही हा संदेश यातून केला.
-
सहकाऱ्यांकडे दुर्लक्ष – झारखंडची स्थापना झाल्यानंतर भाजपाने स्वबळावर लढवलेली ही पहिली निवडणूक आहे.
-
ऑल झारखंड स्टुडंट युनियन पार्टीबरोबरची आघाडी भाजपाने तोडली. सुदेश माहतो हे शेवटपर्यंत आघाडी करण्यासाठी प्रयत्न करत होते.
-
महाराष्ट्रात निवडणूक निकालानंतर शिवसेनेकडून मिळालेला अनुभव लक्षात घेता भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचा भाजपाला फटका बसला. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३७ जागांवर तर मित्रपक्ष एजेएसयूपीने पाच जागांवर विजय मिळवला होता.

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”