-
TNT मोटरसायकल्स गेल्या अनेक वर्षांपासून Royal Enfield च्या बाईक्स मॉडिफाय करत आहे. यावेळी Intercepter 650 ला मॉडिफाय करून त्याला 'नीळकंठ' असं नाव देण्यात आलं आहे. नीळकंठ पक्षाप्रमाणेच ही बाईक असल्याचं आपल्याला पहायला मिळतं.
-
बाईकच्या साईड पॅनलवर नीळकंठ हे नाव लिहिण्यात आलं आहे. तसंच बाजुला हेवी बॅगर्सही लावण्यात आले आहे. तसंच यामध्ये कस्टमाइज्ड क्रोम हँडलबार आणि सिंगल सीटचा पर्याय देण्यात आला आहे.
-
या बाईकमध्ये २३ इंचाच्या अलॉय व्हिलचा वापर करण्यात आला आहे. तसंच पुढील बाजूला कस्टमाइज्ड हेडलँप, आकर्षक फ्युएल टँक आणि इंजिनला कव्हर करणारे क्रोम गार्ड वापरण्यात आले आहे.
-
या बाईकमध्ये इंडिकेटर्स, आरसे आणि पुढील बाजूला ब्रेक देण्यात आले नाहीत. दररोज चालवण्यासाठी ही बाईक योग्य नाही. यामध्ये ६४८ सीसी पॅरलल ट्विन इंजिन देण्यात आलं आहे. ते ४८ एचपी पॉवर आणि ५२ एनएम चे पीक टॉर्क जनरेट करते.
-
या बदलांव्यतिरिक्त गाडीच्या मेकॅनिझममध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.
-

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक