अमित आता अधिकृतरित्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत शर्मिला ठाकरे नेहमीच सावलीसारख्या वावरत असतात. अमित ठाकरे यांचे मितालीसोबतचे नातेसुद्धा असेच आहे. -
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाहसोहळा २७ जानेवारी २०१९ रोजी पार पडला.
या दोघांचा साखरपुडा ११ डिसेंबर २०१७ ला पार पडला होता. मिताली ही वैद्यकीय तज्ज्ञ संजय बोरुडे यांची मुलगी आहे. -
मिताली ही मूळची मुंबईचीच असून ती पेशाने फॅशन डिझायनर आहे.
मिताली बोरुडेने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. -
राज ठाकरेंची मुलगी उर्वशीची मिताली अतिशय जवळची मैत्रीण आहे.
या दोघींनी मिळून काही वर्षांपूर्वी ‘द रॅक’ हा फॅशन ब्रँड तयार केला होता. अमित आणि मिताली लग्नापूर्वी पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मितालीने १२ वीची परीक्षा रुईया महाविद्यालयातून दिली असून पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. -
मिताली लग्नापूर्वी ठाकरे कुटुंबीयांसोबत युरोप टूरलादेखील गेली होती.
-
छायाचित्र सौजन्य- फेसबुक
-
छायाचित्र सौजन्य- फेसबुक

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?