-
जेव्हा आपण आपल्या देशाचा झेंडा पाहातो, तेव्हा आपली मान आपोआपच गर्वाने उंचावली जाते. अशी भावना जगातील प्रत्येक नागरीकाला त्याच्या देशाच्या झेंड्याच्या बाबतीत असते. आज आपण या फोटो गॅलरीच्या माध्यमातून जगातील असे ५ देश पाहाणार आहोत. ज्यांचे झेंडे एकसारखे दिसतात. सूक्ष्म निरिक्षण केल्याशिवाय तो कुठल्या देशाचा झेंडा आहे, हे आपल्या लक्षात येणार नाही.
-
रोमानिया आणि चॅड – रोमानिया हा पूर्व युरोपातील सर्वात सुंदर आणि संपन्न देश आहे. या देशात उंचच उंच पर्वत रांगा आणि सुंदर बागबगीचे आहेत. तर चॅड हा जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत सातव्या क्रमांकाचा देश आहे. (हा झेंडा रोमानियाचा आहे.)
-
या दोन देशांमध्ये काहीही साम्य नाही. परंतु त्यांचे झेडे बरेचसे एकसारखे दिसतात. त्यांचा आकार आणि रंग जवळपास एकसारखाच आहे. फक्त रोमानियाच्या झेंड्यातील रंग हलकेसे फिकट आहेत. परंतु सूक्ष्म निरिक्षण केल्याशिवाय हा फरक आपल्या लक्षात येत नाही. (हा झेंडा चॅडचा आहे.)
-
इंडोनेशिया आणि मोनॅको – इंडोनेशिया हा आशिया खंडातील देश आहे. तर मोनॅको युरोप खंडातील देश आहे. दोन्ही देशांचा इतिहास, त्यांची संस्कृती आणि लोकांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मात्र दोन्ही देशांचे झेंडे एकसारखेच दिसतात. दोन्ही देशाच्या झेंड्यामध्ये पांढरा आणि लाल रंग आहे. फरक फक्त इतकाच आहे की इंडोनेशियाचा झेंडा मोनॅकोच्या तुलनेत थोडा अधिक रुंद आहे.
-
कतर आणि बहरीन – कतर आणि बहरीन मध्य आशीयातील दोन लहानसे देश आहेत. दोन्ही देशांमध्ये केवळ ५०० किलोमीटरचे अंतर आहे. परंतु दोन्ही देश अगदी एकमेकांचे जानी दुशमन आहेत. दोन्ही देशांमध्ये सातत्याने युद्ध होत असते. (हा झेंडा कतरचा आहे.)
-
परंतु एकमेकांचे शत्रू असुनदेखील दोघांचे झेंडे मात्र एकसारखेच आहेत. फरक फक्त इतकाच की कतरचा झेंडा गडद लाल रंगाचा आहे. तर बहरीनचा झेंडा लाल रंगाचा आहे. (हा झेंडा बहरीनचा आहे.)
-
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया – दोन्ही देश जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक म्हणून ओळखले जातात. दोन्ही देशांचे झेंडे एकसारखेच आहेत. (हा झेंडा न्यूझीलंडचा आहे.)
-
फरक फक्त दोन्ही झेंड्यांमधील स्टार्समध्ये आहे. ऑस्ट्रेलियन झेंड्यावर सहा पांढरे स्टार्स आहेत. तर न्यूझीलंडच्या झेंड्यावर चार स्टार्स आहेत. (हा झेंडा ऑस्ट्रेलियाचा आहे.)
-
डाविकडचा झेंडा इटलीचा आहे व उजवीकडचा झेंडा मॅक्सिकोचा आहे.
-
डाविकडचा झेंडा नेदरलँडचा आहे व उजवीकडचा झेंडा लक्झमबर्गचा आहे.
-
भारत आणि नाइजर – नाइजर जगातील सर्वात गरीब देश आहे. या आफ्रिकन देशात ९० टक्के वाळवंट आहे. (हा झेंडा भारताचा आहे)
-
भारत आणि नाईजर या दोन देशांचे झेंडे एकसारखेच दिसतात. फरक फक्त इतकाच की भारतीय झेंड्यावर अशोक चक्र आहे. तर नाइजर झेंड्यावर एक मधोमध भगव्या रंगाचे वर्तुळ आहे. (हा झेंडा नाइजरचा आहे)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक