-
१) आगारातळा रेल्वे स्टेशन – या स्टेशनची बांधणी हुबेहूब उजयंता पॅलेससारखी आहे. (फोटो सौजन्य : विकिपीडिया)
-
२) कामाख्या रेल्वे स्टेशन- या स्टेशनची बांधणी आसाम मधल्या प्रसिद्ध कामाख्या मंदिरासारखी आहे. (फोटो सौजन्य : जागरण.कॉम)
-
३) हावडा जंक्शन – भारत देशातील सर्वात मोठं आणि जुनं रेल्वे स्टेशन म्हणून हावडा जंक्शन प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य : जागरण.कॉम)
-
४) गोरखपूर रेल्वे स्टेशन – १.३५ किमीचा जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म या स्थानकात आहे. (फोटो सौजन्य : रेड्डीत.कॉम)
-
५) लखनऊ चारबाग रेल्वे स्टेशन – या स्टेशन च्या भोवती चार बागा आहेत. या स्टेशन चा एरियल व्ह्यू बुद्धिबळाच्या पटासारखा दिसतो.
-
६) दिल्ली जंक्शन – दिल्ली मधील हे सर्वात जुनं स्थानक आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याप्रमाणेच या किल्ल्याची बांधणी लाल दगडांनी केली आहे.
-
७) श्रीनगर रेल्वे स्टेशन – या स्टेशनचे संपूर्ण बांधकाम लाकडी आहे. हे बांधकाम काश्मिरी शैलीला साजेसे आहे.
-
८) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हे सगळ्यात जुनं, ऐतिहासिक, आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन आहे.
-
९) हबीबगंज रेल्वे स्टेशन – लांब, निमुळती आणि ३ मजली इमारत हे या स्टेशनचे वैशिष्ट्य आहे. भोपाळ मधील हे सर्वात सुंदर रेल्वे स्टेशन आहे. (फोटो सौजन्य : ट्रॅव्हलखाना.कॉम)
-
१०) कटक रेल्वे स्टेशन – या स्टेशनचे बांधकाम किल्ल्यासारखं आहे. हे स्टेशन म्हणजे बांधकामाचा उत्तम नमुना आहे. (फोटो सौजन्य : प्रगतीवादी.कॉम)
-
११) चेन्नई सेंट्रल स्थानक – जागतिक हेरिटेज म्हणून दर्जा मिळालेलं हे रेल्वे स्टेशन आहे. (फोटो सौजन्य : विकिमिडीया कॉमोस)
-
१२) वाराणसी जंक्शन – उत्तर भारतातील रेल्वेचं केंद्र म्हणून हे रेल्वे स्टेशन प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य : इंडिया रेल इन्फो.कॉम)
-
१३) खडगपूर रेल्वे स्टेशन – बंगाल मधील हे सर्वात जुनं रेल्वे स्टेशनआहे. या स्टेशनच्या प्लॅटफॉर्म ची लांबी १०७२ इतकी आहे. (फोटो सौजन्य : इंडिया रेल इन्फो.कॉम)
-
१४) कोल्लम जंक्शन – दक्षिण भारतातील जुन्या स्टेशनमध्ये याचा समावेश होतो. या स्टेशनच्या प्लॅटफॉर्म ची लांबी १.१ किमी. इतकी आहे. (फोटो सौजन्य : इंडिया रेल इन्फो.कॉम)
-
१५) काचेगुडा रेल्वे स्टेशन – या स्टेशनची निर्मिती हैद्राबादच्या निजामाने केली. या स्टेशनच्या बांधकामात इस्लाम आणि ख्रिस्ती संस्कृतीचा मेळ दिसून येतो. मिनार आणि घुमट या स्टेशनच्या सौंदर्यात भर घालतात.(फोटो सौजन्य : इंडिया रेल इन्फो.कॉम)

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग