-
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे महिनाअखेरीस भारत दौऱ्यावर येत आहे. या काळात ते गुजरातमधील अहमदाबाद येथेही जाणार आहेत. अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्या जंगी स्वागताची तयारी सुरू असून, त्यांचा मोठा रोड शो होणार आहे. (Express photo: Javed Raja)
-
साबरमती आश्रमाची सफर त्यांना घडवली जाणार असून नव्याने बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन ते पंतप्रधान मोदी यांच्या समवेत करणार आहेत. याच स्टेडियमवर ह्यूस्टनमधील ‘हाउडी मोदी’ मेळाव्याच्या धर्तीवर ‘केम छो ट्रम्प’ मेळावा (हाउडी ट्रम्प) घेण्यात येणार आहे. (Express photo: Javed Raja)
-
२४ फेब्रुवारीला ट्रम्प हे अहमदाबादमध्ये असणार आहेत. अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रम या दहा कि.मीच्या रस्त्यावरून ट्रम्प यांचा रोडशो होणार असून यावेळी लाखो भारतीय दुतर्फा त्यांच्या स्वागतास सज्ज असतील. (Express photo: Javed Raja)
-
अमेरिकी अध्यक्ष विमानतळावरून आल्यानंतर साबरमती आश्रमास भेट देणार असून महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेला हा आश्रम स्वातंत्र्य लढय़ाचे प्रमुख केंद्र होता. (Express photo: Javed Raja)
-
आता गुजरातमध्ये होणारा मेळावा हा ‘हाउडी ट्रम्प’ म्हणजे ‘केम छो ट्रम्प’ नावाने ओळखला जाणार आहे. मोटेरा येथील पटेल स्टेडियमची प्रेक्षक क्षमता १.१० लाख म्हणजे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमपेक्षा मोठी आहे. (Express photo: Javed Raja)
-
अहमदाबाद महापालिकेने याबाबत अधिकाऱ्यांना रोड शोच्या तयारीसाठी कामे ठरवून दिली आहेत. मोटेरा स्टेडियमवरील कार्यक्रमासाठी ज्यांना निमंत्रित केले आहे त्यांच्या वाहनाच्या पार्किंगची सोय करण्याचा आदेश पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. (Express photo: Javed Raja)
-
ट्रम्प हे अहमदाबादेत येत असल्याने गुजरात विधानसभेत २६ फेब्रुवारीला मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाची तारीख बदलण्यात येत आहे. (Express photo: Javed Raja)
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अहमदाबादमध्ये होणाऱ्या शोड शो दरम्यान त्यांच्या मार्गात त्यांना झोपड्या दिसू नयेत म्हणून एक खास भिंत उभारण्यात येते आहे. (photo : ANI)
-
अहमदाबाद महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ आणि इंदिरा ब्रिज या भागात काही झोपड्या आहेत. (photo : ANI)
-
ट्रम्प यांना झोपड्या दिसू नयेत म्हणून ही भिंत उभारण्यात येते आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक रोड शो होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मार्गातल्या झोपड्या लपवण्यासाठी भिंत बांधली जाते आहे. महापालिकेने दिलेल्या कामानुसार तूर्तास अर्धा किलोमीटरची भिंत उभारली जाते आहे. या भिंतीची उंची सहा ते सात फूट असणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांना फक्त भिंतच दिसणार आहे. (photo : ANI)

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार