-
सोशल मिडियावर एका लहान मुलाचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल होण्यामागील कारण म्हणजे जन्माला आल्याच्या पुढल्या क्षणी या नवजात बालकाने दिलेले एक्सप्रेशन. ब्राझीलमधील रिओ डी जेनेरियोमधील एका रुग्णालयातील हा फोटो असून तो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
देशाच्या राजधानीत असणाऱ्या रुग्णालयात १३ फेब्रुवारी रोजी एका महिलेने एका बालिकेला जन्म दिला. मात्र या मुलीची नाळ कापण्याआधी तिला रडवण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला तेव्हा मुलीच्या चेहऱ्यावर संतापलेले हावभाव दिसले. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
या मुलीचा जन्म २० फेब्रुवारी रोजी होणं अपेक्षित होतं. मात्र सात दिवस आधीच तिचा जन्म झाल्याचे मुलीच्या नातेवाईकांनी सांगितलं. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
दिलेल्या तारखेआधीच पत्नीला प्रसुती कळा येऊ लागल्याने सर्वांना शस्त्रक्रियेआधी टेन्शन आलं होतं. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
नवजात बालिकेच्या चेहऱ्यावरील हे हावभाव पाहून डॉक्टरही गोंधळात पडले. या मुलीचे जन्मानंतरचे संतापलेले हावभाव कॅमेरात टीपले. हा फोटो अनेकांनी मिम्स म्हणून शेअर केला आहे. जन्माला आल्याआल्या तिने डॉक्टरांना खुन्नस दिल्याने ती इंटरनेटवर मीममध्ये वापरण्यात येणाऱ्या फोटोचा भाग झाली असून प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
-
सामान्यपणे बाळा जन्माला आल्यावर ते रडते. मात्र फोटोत दिसणारी ही चिमुकली जन्मानंतर रडलीच नाही. त्यामुळे डॉक्टरांनी नाळ कापण्याआधी बाळाची प्रकृती नीट आहे का? ते प्रतिसाद देत आहे का हे तपासून पाहण्यासाठी तिला रडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलीने रडण्याऐवजी संतापलेले हावभाव आपल्या चेहऱ्यावर दाखवले. त्यानंतर डॉक्टर गोंधळले आणि नंतर हसू लागले. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार मुलीच्या आईचे नाव डॅनियन दी जिजस बार्बाडोसा असं आहे. डॅनियनने रोड्रीगो कुन्स्तामान या फोटोग्राफरला मुलीच्या जन्मानंतरचे फोटो काढण्यासाठी नेमलं होतं. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
जन्माला आल्या आल्या आपल्या मुलीचा पहिला फोटो घेता यावा म्हणून आईने नेमलेल्या रोड्रीगो या फोटोग्राफरने मुलीचा हा रागातील फोटो क्लिक केला. हा फोटो नंतर डॅनियन आणि त्याच्या कुटुंबियांनी फेसबुकवर शेअर केला. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
"जन्म झाल्यानंतर ती रडली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी तिला रडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तीने डोळे मोठे केले. मात्र ती रडली नाही. डॉक्टरही तिच्या पाठीवर चोळत रड रड असं म्हणत होते," असं या बालिकेच्या जन्माचे वर्णन करताना रोड्रीगोने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
"डॉक्टरांनी रडवण्याचा प्रयत्न करताना या मुलीने रडण्याऐवजी संतापलेले एक्सप्रेशन दिले. त्याचवेळी मी फोटो क्लिक केला. नाळ कापल्यानंतर मात्र ती चिमुकली रडू लागली," असं रोड्रीगोने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
नाळ कापल्यानंतर मात्र ती चिमुकली रडू लागली. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
नाळ कापल्यानंतर मात्र ती चिमुकली रडू लागली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
मुलीने जन्मानंतर दिलेल्या एक्सप्रेशनमुळे त्यावरुन अनेक मिम्स तयार झाल्याचे डॅनियन सांगते. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
जन्मानंतर डॉक्टर आणि मुलीचे वडील. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
या मुलीला पाहण्यासाठी तिच्या नातेवाईकांना रुग्णालयात गर्दी केली होती. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
अनेकांना तिची पहिली झकल आपल्या मोबाईलमध्ये टिपायची होती. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
मुलीचे नाव इसाबेल असं ठेवण्यात आलं आहे. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
रुग्णालयातही इसाबेल अशी नावाची पाटी लावण्यात आली आहे. (फोटो Rodrigo Kunstmann Fotógrafo Profissional फेसबुकवरुन साभार)
-
नेटकऱ्यांनी शेअर केलेले मिम्स
-
आणि ती मिम्सचा भाग झाली याचा अजून एक पुरावा

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या