-
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग ई यांच्यात काल फोनवरुन चर्चा झाल्यानंतर चीनचे सैन्य आज गलवान खोऱ्यातून एक ते दोन किलोमीटर माघारी फिरले. ( सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, डोवाल आणि वँग ई यांच्यात तब्बल दोन तास फोनवरुन चर्चा झाली. पश्चिम क्षेत्रातील भारत-चीन सीमारेषेवरील एकूणच परिस्थिती संदर्भात दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात सविस्तर चर्चा झाली असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
-
दोन्ही बाजुंनी नेत्यांकडून मार्गदर्शन घ्यायचे तसेच भारत-चीन सीमेवर शांतता ठेवायची यावर दोन्ही विशेष प्रतिनिधींमध्ये एकमत झाले. मतभेदांना वादामध्ये बदलू द्यायचे नाही हे सुद्धा ठरले आहे.
-
पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ जो तणाव निर्माण झाला होता आणि आता गलवानमधून चीन एक पाऊल मागे हटल्यामुळे स्थिती पूर्ववत होण्यासाठी जी प्रगती झालीय त्याचे श्रेय NSA अजित डोवाल यांना दिले जात आहे.
-
अजित डोवाल यांच्या बाबतीत ‘नाम ही काफी हैं’ असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण डोवाल यांनी त्यांच्या मेहनतीने, कष्टाने स्वत:ची ही ओळख निर्माण केली आहे. गुप्तहेर ते एनएसए असा डोवाल यांचा प्रवास राहिला आहे.
-
देशहितासाठी त्यांनी अनेकदा स्वत:चे प्राण संकटात घातले आहेत. कठिण, अवघड वाटणाऱ्याा अनेक मोहिमा त्यांनी अत्यंत सहजपणे यशस्वी करुन दाखवल्या आहेत. भारताचा हा असा यशस्वी गुप्तहेर आज देशाचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे.
-
अजित डोवाल यांच्याबद्दल आज भारतात दोन मतप्रवाह आहेत. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे तर, दुसऱ्याबाजूला त्यांच्या धोरणांवर मोठया प्रमाणात टीका सुद्धा केली जाते. एक मात्र खरं तुम्हाला चीन आणि पाकिस्तानसारखे शेजारी लाभले असतील तर, डोवाल यांच्यासारखा आक्रमक रणनितीकार सुद्धा तितकाच गरजेचा आहे.
-
पंतप्रधानांच्या मर्जीतले खास अधिकारी अशी डोवाल यांची ओळख आहे. आपल्या कामानेच त्यांनी स्वत:चं ते स्थान निर्माण केलं आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यांमध्ये डोवाल नेहमीच त्यांच्यासोबत असतात. राष्ट्रीय सुरक्षेसह परराष्ट्रविषयक धोरण आखणीमध्ये सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका आहे.
-
२०१४ साली देशात सत्तांतर होऊन मोदी सरकार सत्तेवर आले. तेव्हापासून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणांमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक असो किंवा पुलवामानंतर बालाकोट एअरस्ट्राइक सरकारच्या या बदललेल्या धोरणावर डोवाल यांची छाप पूर्णपणे दिसून येते.
-
अजित डोवाल यांनी 'रॉ' चे अंडरकव्हर एजंट बनून काही वर्ष पाकिस्तानात काम केलं आहे. पाकिस्तानात भारताविरोधात जे कट रचले जात होते, त्याची माहिती गोळा करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. आज पाकिस्तानातही अजित डोवाल या नावाची एक दहशत आहे.

Double Suicide : मुलीने आयुष्य संपवल्याने आईनेही मृत्यूला कवटाळलं, पतीला फोन करुन सांगितलं; “मी तिच्याशिवाय…”