जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत उद्योजक मुकेश अंबानी टॉप ५ मध्ये आहेत. जगातील सर्वांत महाग घरात ते राहतात. मुंबईतील एंटिलिया या त्यांच्या निवासस्थानी आलिशान राहणीमानासाठी लागणारी सर्व साधने उपलब्ध आहेत. अंबानी कुटुंबाचं लाइफस्टाइल हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र तुम्हाला हे माहितीये का, की मुकेश अंबानींच्या स्वयंपाकीला किती पगार मिळतो? एंटिलियामध्ये जवळपास ६०० नोकर काम करतात. मुकेश व नीता अंबानी हे त्यांच्या स्टाफला कुटुंबीयांप्रमाणेच वागणूक देतात असं म्हटलं जातं. हे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल की मुकेश अंबानी यांच्याकडे काम करणाऱ्या एका नोकराची दोन मुलं अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. 'लाइव्ह मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार एंटिलियामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही स्टाफचा पगार दोन लाख रुपयांपेक्षा कमी नाही. म्हणजेच अंबानी यांच्या स्वयंपाकीलाही दर महिन्याला जवळपास दोन लाख रुपये पगार मिळतो स्टाफच्या पगारात शिक्षण भत्ता आणि जीवन विमा यांचासुद्धा समावेश आहे. मुकेश अंबानी यांना साधं जेवण पसंत आहे. त्यानुसारच स्वयंपाकी जेवण बनवतो. पारंपरिक गुजराती पदार्थांसोबतच मुकेश अंबानी यांना दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीमधील अविभाज्य भाग असलेला खाद्यपदार्थ म्हणजेच इडली व सांबार खूप आवडतं. जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवणारे मुकेश अंबानी यांनासुद्धा स्वयंपाक करता येतो. त्यांच्या घरी सर्वांत चांगलं जेवण मुलगी बनवत असल्याचं नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. सर्व छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”