-
पतौडी पॅलेसमधून महिनाभर राहून अभिनेता सैफ अली खान नुकताच मुंबईत परतला. अनेक वर्षात पहिल्यांदाच पतौडी पॅलेसमध्ये त्याने इतका काळ घालवला असेल. "पतौडी पॅलेसमध्ये खूप सुंदर वाटतं. मला तिथे अजून रहायला आवडलं असतं. पण तुम्हाला वास्तवात येऊन, कामाला सुरुवात करायची आहे" असे सैफ म्हणाला. (Photo Credit : @celebrityspaghetti, @brunchdudimanche and indian express)
-
नीमराणा ग्रुप ऑफ हॉटेल्सकडून सैफने हा वडिलोपार्जित महाला ८०० कोटींना विकत घेतल्याची मीडियामध्ये चर्चा आहे. सैफचे वडिल मन्सूर अली खान पतौडी यांनी हा महाल नीमराणा ग्रुप ऑफ हॉटेल्सला भाडेतत्त्वावर दिला होता.
-
भावनिक दृष्टीकोनातून ही संपत्ती अमूल्य आहे, त्यामुळे आर्थिक दृष्टीकोनातून तिचे मूल्य ठरविणे पटत नाही असे सैफ म्हणाला. माझ्या आजी-आजोबांचे, वडिलांचा दफनविधी इथे झालाय. या ठिकाणी एक सुरक्षा, शांतता आहे. या वास्तुशी मी अध्यात्मिक दृष्टया जोडलेलो आहे, असे सैफने सांगितले.
-
शंभर वर्षांपूर्वी सैफच्या आजोबांनी त्यांच्या पत्नीसाठी हा आलिशान पतौडी पॅलेस उभारला. त्यावेळी ते इथले राजे होते. पण पुढे जाऊन त्या सर्व पदव्या रद्द करण्यात आल्या असे सैफ म्हणाला. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.
-
ती एक वेगळी वेळ होती, त्यामुळे माझ्या वडिलांनी अमन आणि फ्रान्सिस यांना पॅलेसमध्ये हॉटेल चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर हा पॅलेस दिला होता. त्यांनी पॅलेसची चांगली देखभाल केली. आमच्यासाठी ते कुटुंबासारखे आहेत.
-
सैफ या वास्तुशी भावनात्मक दृष्टया जोडलेला आहे. २०११ मध्ये वडिल मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन झाल्यानंतर सैफला पुन्हा पतौडी पॅलेस कुटुंबाकडे हवा होता.
-
त्यामुळे जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा भाडेकरार संपवून रक्कम अदा केली आणि पुन्हा घराचा ताबा मिळवला असे सैफने सांगितले.
-
माध्यमांमध्ये किंमतीवरुन ज्या बातम्या दिल्या जातायत, बिलकुल त्या विरुद्ध हा एक चांगला आर्थिक व्यवहार होता. मला हा महाल पुन्हा खरेदी करायची गरज नव्हती कारण आधीपासूनच त्याची मालकी माझ्याकडे होती असे सैफने सांगितले.
-
८०० कोटींना हा महाल विकत घेतल्याची जी बाहेर चर्चा सुरु आहे, त्यावर सैफने अखेर मौन सोडले आहे.
-
पतौडी पॅलेस ताब्यात घेताना अदा कराव्या लागलेल्या किंमतीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा सैफने ही अतिशोयक्ती असून चुकीची माहिती असल्याचे सांगितले.

India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर