-
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांची सर्वात छोटी मुलगी राजलक्ष्मी यादव.
-
राजलक्ष्मीचा जन्म १९९० साली लालू प्रसाद मुख्यमंत्री बनल्यानंतर झाला होता. राजलक्ष्मीचे लग्न मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबात त्यांचे नातू तेज प्रताप सिंह यादव यांच्याबरोबर झाले आहे. हे कौटुंबिक नाते अशा पद्धतीचे आहे की, अखिलेश यादव हे राज लक्ष्मीचे सासरे लागतात.
-
राजलक्ष्मी यादव यांचे लग्न २०१५ साली तेज प्रताप सिंह यादव यांच्याबरोबर झाले.
-
डिम्पल यादव मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातील मोठया सूनबाई आहेत. मुलायम सिंह यांचे सुपूत्र अखिलेश यादव यांच्याबरोबर डिम्पल यादव यांचे लग्न झाले आहे. डिम्पल यादव आणि राजलक्ष्मीमध्ये सासू-सूनेचे नाते आहे.
-
डिम्पल यादव या मूळच्या उत्तराखंडच्या आहेत. कुटुंबा संभाळण्याबरोबरच पतीच्या बरोबरीने त्या सुद्धा राजकारणात सक्रीय आहेत. डिम्पल यादव यांचे वडिल लष्करातील निवृत्त कर्नल आहेत.
-
अपर्णा यादव मुलायम सिंह यादव यांचे छोटे पुत्र प्रतीक यादव यांची पत्नी आहे. त्या नात्याने त्या सुद्धा राजलक्ष्मी यांच्या सासू आहेत.
-
अपर्णा यादव वरिष्ठ पत्रकार आणि सूचना आयुक्त राहिलेल्या अरविंद सिंह बिष्ट यांची मुलगी आहे.
-
मुलायम सिंह यादव यांचा भाऊ शिवपाल यादव यांचा मुलगा आदित्यचे लग्न झाले. त्याच्या पत्नीचे नाव सुद्धा राजलक्ष्मी सिंह यादव आहे.
-
आदित्यची पत्नी राजलक्ष्मी यांची आई शारदा कुंवर सिंह मैहर स्टेटच्या राजकुमारी होत्या. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह राजलक्ष्मीचे आजोबा लागतात.
-
मुलायम सिंह यादव यांच्या दोन्ही सूना डिम्पल यादव आणि अपर्णा यादव राजकारणात सक्रीय आहेत. (सर्व फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

१३ सप्टेंबरनंतर ‘या’ ४ राशीच्या लोकांना मिळणार पैसा, गाडी अन् बरंच काही…, आयुष्यात अखेर येणार श्रीमंती अन् कामात येईल मोठं यश