जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असाल तर अर्थातच तुमची हौससुद्धा तितकीच महागडी असेल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांना मौल्यवान दागिन्यांपासून महागड्या घडाळ्यांपर्यंत अनेक गोष्टींची आवड आहे. नीता अंबानी या वेस्टर्न लूकसोबतच ट्रेडिशनल आऊटफिटमध्येही पाहायला मिळतात. त्यांना अनेकदा अत्यंत महागड्या साड्यांमध्ये पाहिलं गेलंय. मीडिया रिपोर्टनुसार, मुलगा आकाश अंबानीच्या साखरपुड्यात नीता अंबानी यांनी जवळपास ४० लाख रुपयांची साडी नेसली होती. कौटुंबिक कार्यक्रम किंवा लग्नसमारंभात त्या नेहमी भरजरी दागिन्यांमध्ये पाहायला मिळतात. त्यांची ही डिझायनर ज्वेलरी अत्यंत महागडी आहे. नीता अंबानींना स्टायलिश फुटवेअरचीही आवड आहे. त्यांच्याकडे पेड्रो, गार्सिया, जिम्मी चू, पेलमोडा, मार्लिन यांसारख्या मोठमोठ्या ब्रँडच्या चपला व सँडल आहेत. या ब्रँडच्या चपलांची किंमत लाखांपासून सुरू होते. नीता अंबानी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बुल्गारी, कार्टियर, राडो, गुची, केल्विन केलिन आणि फोसिल यांसारख्या ब्रँडची घड्याळं वापरताना पाहायला मिळतात. या ब्रँडच्या घडाळ्यांची किंमत दीड लाख रुपयांपासून सुरू होते. जगातील सर्वांत महागड्या ब्रँडच्या हँडबँग नीता अंबानी वापरतात. त्यांच्या या हँडबँग्सची किंमत नेहमीच चर्चेचा विषय असते. त्यांच्याकडे शनेल, गोयार्ड आणि जिम्मी चू केरी मौजू यांसारख्या ब्रँड्सचे हँडबँग कलेक्शन आहे.

Darsh Amavasya Horoscope: आज १२ पैकी कोणत्या राशींना लाभेल दुप्पट पुण्य तर कोणाला होईल लाभच लाभ; वाचा राशिभविष्य