-
पुण्यातल्या आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी होणाऱ्या कारवाईला स्थानिकांकडून प्रचंड विरोध होत आहे. नागरिकांना पूर्वसूचना न देता त्यांचा घरावर जेसीबी चालवण्यात आली. दरम्यान, झोपेत असतांना पोलिसांनी बळाचा वापर केला, आम्ही जगायचं तरी कसं, अशी व्यथा स्थानिक तरुणीने मांडली आहे.
-
"आमच्या वसाहतीमधील सर्व जण झोपेत असताना, पहाटेच्या सुमारास पोलीस आले. आमच्या वसाहतीमधील प्रत्येकाला बाहेर काढू लागले आणि वसाहत खाली करावी लागेल, असे सांगू लागले. आम्हाला काहीच समजत नव्हते. आता आमच सर्व साहित्य रस्त्यावर, आम्ही कस जगायचं?", असा प्रश्न निर्माण झाला असल्याची भावना आंबिल ओढयातील बाधित तरुणी सायली मुळे हीने व्यक्त केली.
-
यावेळी सायली मुळे म्हणाली की, "आंबिल ओढा या ठिकाणी आमचे कुटुंब १९७५ पासून राहत आहे. एवढ्या वर्षात आमच्या वसाहतीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. मात्र आज पहाटेच्या सुमारास अचानक पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी आले. आम्हाला घर खाली करण्यास सांगितले. आम्हाला काहीच समजत नव्हते. आमचं कुटुंब १५ जणांचे आहे. आम्हाला त्यांनी हात धरून बाहेर काढले. ही कुठली कारवाई?,
-
आमचा विकास कामाला विरोध नाही. आमच पुनर्वसन करणे आवश्यक होते. मात्र तसे काहीच केले नाही. आता आम्ही सर्व महिलांनी रस्त्यावर राहायाचे का? आम्हाला काही झाल तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल देखील सायली यांनी उपस्थित केला.
-
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, "आम्ही लहानाचे मोठे इथे झालो, माझ्या आजी आजोबांनी एक-एक रुपये गोळा करून घर उभे केले आणि आता एका क्षणात घर जमीनदोस्त होताना पाहण्याची वेळ आली आहे" हे सांगत असतांना सायली यांना अश्रू अनावर झाले होते.
-
पुणे महापालिका उपायुक्त अविनाश सपकाळ याबाबत म्हणाले, "आंबिल ओढा येथील नाल्या लगत असलेल्या १३६ घरांना प्रशासनाकडून नोटीस पाठविण्यात आली होती. सर्व नियम पाळून कारवाई करण्यात येत असून या सर्व बाधित कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे"

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त