-
कॉफी हे फक्त एक पेय नाही, तर अनेक देशांमध्ये तो एक सांस्कृतिक विधी आहे. जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात लोक त्यांच्या ‘कप ऑफ जो’ म्हणजेच कॉफीचा आनंद कसा घेतात, ते आपण पाहूया.
-
इथिओपिया-कॉफी सेरेमनी : कॉफीचे जन्मस्थान असलेल्या इथिओपियामध्ये विस्तृत स्वरूपातील कॉफी समारंभ होतात, जिथे कॉफी बीन्स भाजल्या जातात, दळल्या जातात आणि जेबेना पॉटमध्ये ताजी कॉफी तयार केली जाते.
-
इटली-एस्प्रेसो कल्चर : इटलीमध्ये कॉफी म्हणजे बारमध्ये झटपट एस्प्रेसो पिणे, मोठ्या मगमध्ये बसून कॉफी पिण्याची पद्धत तिथे नाही. तसेच कॅपेचिनो हे फक्त सकाळचे पेय मानले जाते.
-
मोरोक्को-मसालेदार कॉफी: येथील कॉफी वेलची, जायफळ आणि दालचिनी सारख्या मसाल्यांनी बनवली जाते, ज्यामुळे तिला उबदार आणि सुगंधी चव मिळते.
-
स्वीडन-फिका परंपरा: ‘फिका’ म्हणजे फक्त कॉफी नाही, तर येथे तो पेस्ट्रीसोबत शांतपणे घेतलेला एक ब्रेक असतो, जो कनेक्शन आणि निवांतपणाला प्रोत्साहन देतो.
-
टर्की-थीक आणि स्ट्राँग ब्रू: टर्किश कॉफी सेझवे(cezve) नावाच्या भांड्यात बनवली जाते आणि फिल्टर न करता दिली जाते. ती इतकी प्रतिष्ठित आहे की ती युनेस्कोच्या अमूर्त (Intangible) सांस्कृतिक वारसा यादीत देखील आहे.
-
व्हिएतनाम – एग कॉफी आणि आणि ड्रिप ब्रू: व्हिएतनामी कॉफी स्ट्राँग असते आणि बहुतेकदा गोड कंडेन्स्ड मिल्क किंवा फेटलेल्या अंड्यातील पिवळ्या बल्कसोबत दिली जाते ज्यामुळे तिला क्रीमी आणि डेझर्टसारखी चव येते.

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…