-
बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचा निर्णय कॅनडा सरकारने घेतला आहे. बिश्नोई टोळीवर अनेक गंभीर आरोप असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
एनडीपी आणि कंझर्व्हेटिव्ह नेत्यांच्या मागणीनंतर कॅनडा सरकारने सोमवारी (२९ सप्टेंबर) लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
कॅनडाच्या सरकारने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीला फौजदारी संहितेअंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे कॅनेडियन लोकांना या टोळीला आर्थिक किंवा भौतिक मदत करण्यास मनाई असेल. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसांगरी यांनी म्हटलं की, “या निर्णयामुळे कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना हिंसाचार आणि धमकी देऊन भीती निर्माण करणाऱ्या या संघटनेशी सामना करण्यासाठी अधिक अधिकार मिळतात.”(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
दरम्यान, ब्रिटिश, कॅनडाच्या कोलंबिया, ओंटारियो आणि अल्बर्टामध्ये सक्रिय असलेली ही टोळी २०२३ पासून ५० हून अधिक हिंसक घटनांशी जोडलेली आहे. अनेक खंडणीचे गुन्हे या टोळीवर आहेत.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
तसेच या टोळीवर भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खंडणी, खून, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या संबंधित गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर कॅनडाने हा निर्णय घेतला आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
कॅनडा सरकारच्या या निर्णयामुळे कॅनेडियन अधिकाऱ्यांना कॅनडामधील बिश्नोई टोळीशी संबंधित कोणत्याही मालमत्ता, मग त्यामध्ये पैसे, वाहने आणि इतर मालमत्तांचा समावेश असलेल्या गोष्टी गोठवण्याची किंवा जप्त करण्याची परवानगी मिळते. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
कॅनडा सरकारच्या या निर्णयामुळे कायद्याच्या अंमलबजावणीला विविध गुन्ह्यांसाठी विशेषतः दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा करण्याशी संबंधित गुन्ह्यांसाठी किंवा टोळी सदस्यांना अटक करण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी अधिक अधिकार मिळतात.(फोटो-संग्रहित छायाचित्र)