-
सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडीत, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू यांच्यासारख्या अनेक खेळाडूंची कारकिर्द घडवण्यात मोठा वाटा असलेल्या प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे काल (२ जानेवारी रोजी) मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी सचिन तसेच विनोद कांबळी यांनी स्वत: साश्रुनयनांनी आचरेकर सरांच्या पार्थिवाला खांदा दिला. (सर्व फोटो: अमित चक्रवर्ती, एक्सप्रेस फोटग्राफर)
-
आचरेकर सरांवर आज शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळीही सचिनला आश्रू अनावर झाले.
-
शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
सचिनने स्वत: साश्रू नयनांनी आचरेकर सरांच्या पार्थिवाला खांदा दिला.
-
आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या आचरेकर सरांनी भारतीय क्रिकेटमधल्या एका पिढीला घडवण्यात मोठा वाटा उचलला आहे. सचिन आणि आचरेकर सरांचे नाते खास होते. प्रत्येक गुरुपोर्णिमेला आणि सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी सचिन आवर्जून त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी जात असे.
-
आचकर सरांच्या मृत्यूनंतर सचिनने ट्विटवर एक भावनिक पोस्ट लिहीली होती. “आचरेकर सरांनी आम्हाला मैदानात आणि मैदानाबाहेर नेहमी सरळ खेळ करायला शिकवलं. त्यांच्या आयुष्यात आम्हाला स्थान मिळालं आणि त्यांच्या हाताखाली मी शिकलो हे माझं भाग्य समजतो. आचरेकरांमुळे स्वर्गातलं क्रिकेट आता समृद्ध होईल. माझ्या आयुष्यातलं त्यांचं योगदान शब्दात सांगता येणार नाही. मला क्रिकेटची बाराखडी त्यांनीच शिकवली. मी आज जिथे आहे त्याचं सगळं श्रेय आचरेकर सरांना आहे. काही दिवसांपूर्वी मी काही विद्यार्थ्यांसोबत त्यांना भेटलो होतो, त्यावेळी आमच्या चांगल्या गप्पा झाल्या. त्यामुळे सर जिकडे जातील तिकडे प्रशिक्षण देत राहतील.” या शब्दांमध्ये सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
सचिन पूर्णवेळ आचरेकर सरांच्या पार्थिवाच्या बाजूलाच उभा असल्याचे दिसले.

“पाकिस्तानला शिक्षा गरजेची होती”, बुमराहच्या ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशनवर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया