-
क्रिकेट-फुटबॉलच्या प्रेमाने झपाटलेल्या मुंबईकरांना शुक्रवारी ‘NBA’ अर्थात नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या सामन्याचा अनुभव घेतला. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
साडेसहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या खेळाडूंच्या वेगवान खेळाने चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
सॅक्रॅमेंटो किंग्ज आणि इंडियाना पेसर्स या दोन संघांमध्ये हा सामना आयोजित करण्यात आला होता. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
अमेरिकेत अनेक दशकांपासून लोकप्रिय असलेल्या एनबीएच्या पहिल्या मैत्रीपूर्ण सामन्याला मुंबईकरांनीही उत्स्फूर्त दाद दिली. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
बास्केटबॉल खेळाची लोकप्रियता लक्षात घेता, लवकरच भारतातही ‘एनबीए’ लीग सुरू करण्याचा विचार असल्याचे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे कमिशनर अॅडम सिल्व्हर यांनी सांगितले. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
४८ मिनिटांच्या निर्धारित वेळेत सामना ११८-११८ असा बरोबरीत सुटल्यानंतर इंडियाना पेसर्सने पाच मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत १३२-१३१ अशा फरकाने हा सामना जिंकला. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
अखेरच्या तीन मिनिटांत सॅक्रॅमेंटो किंग्ज ११३-१०७ अशा आघाडीवर होता. पण इंडियाना पेसर्सने दमदार खेळ करत ११८-११८ अशी बरोबरी साधली. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
पाच मिनिटांच्या जादा डावात इंडियाना पेसर्सने सुरुवातीलाच सात मिनिटांची आघाडी घेतली. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
अखेरच्या सेकंदाला तीन गुणांची गरज असताना सॅक्रॅमेंटो किंग्जला दोन गुणांचा बास्केट करता आला. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
त्यामुळे अवघ्या एका गुणाच्या फरकाने इंडियाना पेसर्सने विजय मिळवला. (छाया – निर्मल हरिंद्रन)

हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या