-
इंदूर कसोटीत मयांकचं बांगलादेशविरुद्ध द्विशतक. मयांकने १२ डावांमध्ये आपलं दुसरं द्विशतक झळकावलं. डॉन ब्रॅडमन यांना अशी कामगिरी करायला १३ डाव लागले होते.
-
बांगलादेशविरुद्ध दोन द्विशतकं झळकावणारा मयांक पहिला भारतीय सलामीवीर. याआधी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनी बांगलादेशविरुद्ध दोन द्विशतकं झळकावली आहेत.
-
मयांकने ३३० चेंडूत २४३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत २८ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. कसोटीत एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या सिद्धू यांच्या विक्रमाशी मयांकची बरोबरी.
-
कसोटीत सलामीवीर या नात्याने बांगलादेशविरुद्ध मयांकने झळकावलेल्या २४३ धावा या सर्वोत्तम ठरल्या आहेत. याआधी आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथने २००८ साली सलामीला येताना २३२ धावा केल्या होत्या.
-
बांगलादेशविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम मोडण्यासाठी मयांकला ५ धावा कमी पडल्या.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”