-
'फ्लाइंग सिख' या टोपणनावाने गौरवले जाणारे मिल्खा सिंग यांचा आज ९०वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १९२९ साली पंजाब प्रांतातील मुझ्झफरगढ या ठिकाणी झाला. हे ठिकाण १९४७ नंतर पाकिस्तानात आहे.
-
'फ्लाईंग सिख' या टोपण नावाने ओळखले जाणारे धावपटू मिल्खा सिंग यांनी १९६० (रोम) व १९६४ (टोकियो) साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
-
मिल्खा सिंग हे असे धावपटू होते की त्यांनी कोणत्याही सरावाशिवाय, कोणत्याही आर्थिक मदतीविना, कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर हे अंतर त्याने ४५.९ सेकंदात पार केले. त्यांचा विक्रम अजूनही कोणत्याही भारतीयाला मोडता आलेला नाही.
-
पटियाला येथे १९५६ माधे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दोन वर्षांनी झालेल्या स्पर्धेत त्यांनी २०० व ४०० मीटर शर्यंतीत विक्रमी वेळ नोंदवली.
-
१९५८ साली टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धत त्यांनी आपली कामगिरी कायम ठेवत २०० व ४०० मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला.
-
सहा सप्टेंबर १९६० साली ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ४०० मीटर शर्यतीत आपला मागच्या वर्षीचा विक्रम मोडत. त्या शर्यतीत ते चौथे आले होते. ०.१ सेकंदाने त्याचे कास्य पदक हुकले होते. त्या स्पर्धेत ते कोणत्याही सरावाशिवाय व बुटांशिवाय धावले होते.
-
त्याआधी त्यांनी १९५८ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले होते.
-
१९६२ च्या आशियाई स्पर्धेत २०० मीटर शर्यतीही सुवर्णपदक जिंकले होते.
-
त्या काळात मिल्खा सिंग देशभरातील तरूणांचे आदर्श होते.
-
त्यांनी जिंकलेली सर्व पदके, चषक, ब्लेझर व जे बूट घालून त्यांनी विक्रम मोडला ते बूट त्यांनी राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले.
-
त्यांच्या अभुतपूर्वक कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, “मुलीला नांदवायचे नव्हते तर…”