-
गौतम गंभीर आक्रमकतेसाठी ओळखले जातात. मैदानावर प्रतिस्पर्धी संघासाठी ते जितके धोकादायक होते. तितकेच मैदानाबाहेरही ते आक्रमक आहेत. (सर्व फोटो सौजन्य – गौतम गंभीर इन्स्टाग्राम)
-
– भारताच्या या माजी डावखुऱ्या फलंदाजाने राष्ट्रीय तसेच सामाजिक मुद्यांवर नेहमीच सडेतोड मते मांडली आहेत. सध्या गौतम गंभीर खासदार आहेत.
-
गौतम गंभीर यांनी वनडे, कसोटी आणि ट्वेंटी-ट्वेंटी तिन्ही प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. आयपीएलमध्ये ते केकेआरचे कर्णधार होते.
-
१४ ऑक्टोंबर १९८१ रोजी दिल्लीत गौतम गंभीर यांचा जन्म झाला. गौतम यांचे वडिल दीपक गंभीर हे कपडयांचे व्यापारी आहेत तर आई गृहिणी.
-
गौतम गंभीर यांची बहिण एकता त्यांच्यापेक्षा दोनवर्षांनी लहान आहे.
-
वयाच्या १० व्या वर्षापासून गौतम गंभीर यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. नवी दिल्लीच्या मॉर्डन स्कूलमधून शिक्षण घेतले आणि हिंदू कॉलेजमधुन पदवी मिळवली.
-
ऑक्टोंबर २०११ मध्ये गौतम गंभीर यांनी नताशा जैन बरोबर विवाह केला. त्यांची पत्नी एका नामांकित औद्योगिक कुटुंबाशी संबंधित आहेत. या जोडप्याला आझीन आणि अनायझा अशा दोन मुली आहेत.
-
गौतम गंभीरने आतापर्यंत ५८ कसोटी सामन्यात ४१.९५ च्या सरासरीने ४,१५४ धावा केल्या आहेत. यात २०६ सर्वोच्च धावसंख्या आहे.
-
गौतम गंभीर यांनी १४७ एकदिवसीय सामन्यात ३६.६८ च्या सरासरीने ५,२३८ धावा केल्यात यात १५० सर्वोच्च धावसंख्या आहे. तीन डिसेंबर २०१८ रोजी गौतम गंभीर यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवडणूक प्रचारातील गौतम गंभीर यांचा हा फोटो आहे.
-
गौतम गंभीर यांची २०११ साली वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील ९७ धावांची खेळी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. भारताच्या वर्ल्डकप विजयात गंभीर यांच्या खेळीचे महत्वपूर्ण योगदान आहे.

कोणत्या राशींना नवीन कामाची सुरवात करण्यास उत्तम ठरेल दिवस? वाचा मेष ते मीनचे मंगळवारचे राशिभविष्य