-
क्रिकेटमध्ये Catches win Matches हा शब्दप्रयोग चांगलाच प्रचलित आहे. अनेकदा हातातून निसटून गेलेला सामना क्षेत्ररक्षकांनी घेतलेल्या एका अफलातून कॅचमुळे फिरला आहे.
-
कुलदीप यादव
-
आज आपण २०१० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या ५ खेळाडूंविषयी माहिती करुन घेणार आहोत.
-
५) हाशिम आमला, दक्षिण आफ्रिका – १७० झेल…आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरीही आमलाने गेल्या १० वर्षात मैदानात आपली चपळाई दाखवली आहे. २०१० नंतर घेतलेल्या १७० झेलांपैकी ७७ झेल हे वन-डे, कसोटीत ७४ तर टी-२० मध्ये १९ झेलांचा समावेश आहे.
-
४) स्टिव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलिया – २०५ झेल, उत्कृष्ठ फलंदाजीसाठी ओळखला जाणारा स्मिथ हा तितकाच चांगला क्षेत्ररक्षक आहे. २०१० नंतर त्याच्या खात्यात २०५ झेल जमा आहेत. यापैकी ११७ कसोटी, ६७ वन-डे आणि २१ टी-२० क्रिकेटमध्ये घेतले आहेत.
-
३) जो रुट, इंग्लंड – २०६ झेल, स्मिथप्रमाणे चांगल्या फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या जो रुटच्या नावावर २०१० पासून २०६ झेल जमा आहेत. यापैकी ११४ झेल कसोटीत, ७४ वन-डे मध्ये तर १८ झेल रुटने टी-२० मध्ये घेतलेत.
-
२) रॉस टेलर, न्यूझीलंड – २२३ झेल, न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी खेळाडू अशी टेलरची ओळख. आक्रमक फलंदाजीसोबत तो चांगला क्षेत्ररक्षकही आहे. २०१० पासून त्याच्या नावावर २२३ झेल जमा असून यातले १०६ झेल कसोटी, ८९ वन-डे तर २८ टी-२० मध्ये घेतले आहेत.
-
१) विराट कोहली, भारत – २४४ झेल, भारतीय संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली क्षेत्ररक्षणातही तितकाच माहिर आहे. २०१० पासून विराटच्या नावावर २४४ झेल जमा असून यातले १२१ झेल कसोटी, ८२ झेल वन-डे तर ४१ झेल टी-२० क्रिकेटमध्ये विराटने घेतले आहेत.

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा