-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि साक्षी यांच्या लग्नाला काल १० वर्ष पूर्ण झाली. डेहराडूनमध्ये चार जुलै २०१० रोजी धोनी आणि साक्षी विवाहबद्ध झाले. (फोटो सौजन्य – एमएमस धोनी / साक्षी धोनी इन्स्टाग्राम)
-
धोनी आणि साक्षीचा विवाह संपूर्ण देशासाठीच आश्चर्याचा धक्का होता. कारण कोणाला काही कळू न देता अत्यंत गुपचूपपणे साध्या पद्धतीने हा विवाह करण्यात आला.
-
लग्नानंतर पाच वर्षांनी सहा फेब्रुवारी २०१५ रोजी साक्षीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. धोनी आणि साक्षी दोघे आई-बाबा बनले. झिवा असे त्यांच्या मुलीचे नाव आहे.
-
करोना व्हायरसच्या संकटामुळे धोनी आणि साक्षीने त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस रांची येथील त्यांच्या फार्महाऊसवर साजरा केला असेल. लॉकडाउनच्या या काळात धोनी आणि साक्षी सध्या रांची येथील आलिशान फॉर्महाऊसवर एकत्र वेळ घालवत आहेत.
-
धोनीच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावरुन लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचा विवाह कसा सगळयांसाठी आश्चर्याचा धक्का होता त्या आठवणी सुद्धा जागवल्या.
-
धोनीच्या लग्नाला फार कमी निवडक पाहुणे उपस्थित होते. यामध्ये बॉलिवूडमधला धोनीचा मित्र जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू सुद्धा लग्नाला हजर होते असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
-
साक्षी आणि धोनी दोघे परस्परांना लहानपणापासून ओळखत होते. पण त्यावेळी ते प्रेमात पडले नाहीत. योग्य वयात आल्यानंतरच त्यांचा प्रेमाचा सूर जुळला. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार धोनी आणि साक्षीचे वडिल एकाच कंपनीत नोकरीला होते.
-
धोनी आणि साक्षी परस्परांच्या संपर्कात नव्हते. पण २००७ साली कोलकात्ताच्या ताज बेंगाल हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमात नाते फुलत गेले. औरंगाबादमधून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतल्यानंतर साक्षी कोलकात्त्यातील हॉटेलमध्ये इंटर्नशिप करत होती.
-
"दहा वर्ष एकत्र चालणे हे टीमवर्क आहे. प्रगतीसाठी आम्ही दोघांनी एकमेकांना मोकळीक दिली त्यातून आम्ही अधिक परिपक्व झालो. त्यावेळी आम्हाला दोघांना परस्परांची प्रचंड ओढ होती. म्हणून अधिक जवळ आलो. चांगल्या-वाईट काळात परस्परांना साथ देत राहिलो, त्यामुळे आम्हाला प्रेमाची जादू कळली" असे साक्षीने म्हटले आहे.
-
"आज आम्ही हा दिवस साजरा करतोय, त्यासाठी पालक, भावंडं , नातेवाईक आणि मित्रपरिवाराचे कृतज्ञ आहोत. आमच्यावर प्रेम करणाऱ्या, काळजी घेणाऱ्या मित्रांची उणीव आम्हाला प्रकर्षाने जाणवतेय. ज्यांनी नेहमीच आम्हाला खंबीर साथ दिली आहे" साक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा मेसेज पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम