-
भारतीय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस. ICC च्या तीनही ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे.
-
गेल्या आठ ते १० महिन्यापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. या काळात धोनीने काय-काय केलं याचा घेतलेला हा आढावा…
-
World Cup 2019 मध्ये भारताचा न्यूझीलंडकडून उपांत्य फेरीत पराभव झाला. त्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली.
-
धोनी लवकरच निवृत्ती जाहीर करेल असे वाटत असतानाच त्याने २ महिने विश्रांती घेत असल्याचा निर्णय BCCI ला कळवला.
-
धोनी त्या कालावधीत जम्मू काश्मीरला जाऊन लष्करी सेवेत रूजू झाला. धोनी १०६ टेरिटॉरियल आर्मी बटालियनचा सदस्य (पॅरा) होता.
-
ऑगस्ट महिन्यात धोनीचा लष्करातील जवानांबरोबरचा वॉलीबॉल खेळतानाचा व्हिडीओ खूपच चर्चेत आला होता.
-
लष्करी सेवेत असताना धोनीने स्वत:चे बूट पॉलिश करण्यासाठी सगळी कामं स्वत: केली. त्याच्या या प्रतिबद्धतेसाठी त्याची स्तुतीदेखील करण्यात आली होती.
-
नोव्हेंबरच्या आसपास धोनी मैदानावर परतणार असे वाटत असताना त्याने विश्रांतीचा कालावधी वाढवून घेतला आणि आपल्या कुटुंबासोबत छान वेळ घालवला.
-
मसूरीच्या बर्फात मुलगी झिवा हिच्यासोबत त्याने केलेल्या धमाल-मस्तीचा व्हिडीओ चाहत्यांना त्यावेळी खूपच भावला होता.
-
नववर्षाचे स्वागत करून झाल्यानंतर हळूहळू IPL चे वारे वाहू लागले होते. IPL 2020 मधील धोनीच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
-
एकीकडे या चर्चा सुरू असताना धोनी मात्र आपली मुलगी झिवा हिच्यासोबत वेळ घालवण्यात मग्न होता.
-
जानेवारी महिन्याच्या अखेरीस असलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही धोनीचा समावेश नव्हता. त्यावेळी धोनी आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना घेऊन कान्हा नॅशनल पार्कमध्ये गेला होता. तेथे त्याने वाघाचा काढलेला फोटो खूपच अप्रतिम होता.
-
२९ मार्चला IPLची सुरूवात होणार हे नक्की होतं, त्यामुळे मार्चच्या सुरूवातीला धोनी आणि इतर खेळाडू चेन्नईत दाखल झाले. तिथे त्यांनी सराव सत्रात घाम गाळला.
-
IPL च्या काही दिवस आधी करोनाने देशात हातपाय पसरले आणि त्यामुळे धोनीचे क्रिकेटच्या मैदानावरील पुनरागमन लांबणीवर पडले.
-
देशभरात लॉकडाउन सुरू झाल्यावर धोनीने आपल्या कुटुंबासमवेत थेट फॉर्महाऊस गाठलं. त्याच फार्महाऊसमध्ये गेले तीन महिने धोनी मुक्कामी आहे. तिथे तो दाढी वाढवून झकासपैकी ऑर्गनिक शेती करताना दिसतो आहे.
-
IPL बाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता धोनीचं क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केव्हा होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?