-
मँचेस्टर कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर ११३ धावांनी मात करत यजमान इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. (फोटो सौजन्य – रॉयटर्स आणि एपी)
-
सलामीच्या सामन्यात झालेला पराभव, दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया जाणं यामुळे इंग्लंडला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार हे दिसतच होतं.
-
परंतू दुसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करत विंडीजचा डाव झटपट गुंडाळला.
-
पहिल्या डावात शतक, दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक आणि दोन्ही डाव मिळून गोलंदाजीत ३ बळी या कामगिरीसाठी स्टोक्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
-
आतापर्यंत या मालिकेत बेन स्टोक्सचंच वर्चस्व राहिलेलं आहे. पाहूया ही भन्नाट आकडेवारी…
-
३४३ धावांसह स्टोक्स या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. (पहिली कसोटी – ४३ आणि ४६) (दुसरी कसोटी – १७६ आणि नाबाद ७८)
-
११४.३३ च्या सरासरीने स्टोक्सने या मालिकेत आतापर्यंत धावा काढल्या आहेत.
-
५८९ चेंडूचा सामना करत स्टोक्स आतापर्यंत मालिकेत सर्वाधिक चेंडूचा सामना करणारा फलंदाज ठरलाय.
-
५ षटकार लगावत सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज हा मानही स्टोक्सच्या नावावर जमा आहे.
-
आता एक नजर गोलंदाजीमधल्या कामगिरीवर…
-
दोन सामन्यांत मिळून स्टोक्सच्या खात्यावर ९ बळी जमा आहेत.
-
३४.६ हा गोलंदाजीतला स्टोक्सचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे, तर १६.३३ ही स्टोक्सची गोलंदाजीतली दुसरी सर्वोत्तम सरासरी आहे.

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला