-
करोनाच्या दणक्यानंतर अखेर IPL 2020 साठी UAE ची निवड जवळपास निश्चित झाली आहे.
-
या आधीदेखील IPL 2014 मधील सुरूवातीचे २० सामने UAE मध्ये खेळवण्यात आले होते.
-
संग्रहित छायाचित्र
-
UAE मधील अबु धाबी, दुबई आणि शारजा असा तीन ठिकाणी सामने खेळवण्यात आले होते. पाहूया त्याचा इतिहास…
-
२० सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणारा संघ ८ वेळा तर आव्हानाचा पाठलाग करणारा संघ ११ वेळा विजयी झाला. १ सामना अनिर्णित राहिला.
-
प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या – १५१
-
सर्वोच्च धावसंख्या – किंग्ज इलेव्हन पंजाब ४ बाद २०६ वि. चेन्नई सुपर किंग्ज (अबु धाबी)
-
नीचांकी धावसंख्या – सर्व बाद ७० रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स (अबु धाबी)
-
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या – ग्लेन मॅक्सवेल (९५) वि. चेन्नई सुपर किंग्ज (अबु धाबी), वि. सनरायजर्स हैदराबाद (शारजा)
-
सर्वोत्तम गोलंदाजी – १३ धावांत ४ बळी, लक्ष्मीपती बालाजी (पंजाब) वि. सनरायजर्स हैदराबाद
-
सर्वोच्च पॉवर-प्ले (पहिल्या ६ षटकातील) धावसंख्या – बिनबाद ७०, चेन्नई सुपर किंग्ज वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (अबु धाबी)
-
नीचांकी पॉवर-प्ले धावसंख्या – ५ बाद २२, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स (अबु धाबी)
-
सर्वात जलद अर्धशतक – १९ चेंडूत, डेव्हिड मिलर (किंग्ज इलेव्हन पंजाब) वि. राजस्थान रॉयल्स (शारजा)
-
सर्वात संथ अर्धशतक – ४६ चेंडूत, अजिंक्य रहाणे (राजस्थान रॉयल्स) वि. सनरायजर्स हैदराबाद (अबु धाबी)
-
सर्वाधिक निर्धाव षटकं – ८, संदीप शर्मा (किंग्ज इलेव्हन पंजाब)

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटबाबत मोठी बातमी; आता तांत्रिक दोष आल्यास वाहन विक्रेत्यांकडून…