-
कोणत्याही खेळाडूसाठी आपला फिटनेस लेव्हल कायम राखणं हे महत्वाचं असतं. म्हणून खेळ सुधारण्यासोबत प्रत्येक खेळाडू मैदानात आणि जिममध्ये व्यायाम करण्याकडे भर देत असतात.
-
टीम इंडियाचा युवा गोलंदाज नवदीप सैनी मैदानात आपल्या भेदक माऱ्यासोबतच फिटनेस लेव्हलसाठी ओळखला जातो.
-
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत नवदीपने आपली चमक दाखवून दिली आहे.
-
कसोटी क्रिकेटचा टिळा नवदीपला लागलेला नसला तरीही त्याची स्थानिक क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटमधली कामगिरी पाहता येत्या काही वर्षांत त्याला कसोटी संघाचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
-
गोलंदाजीसोबत नवदीप सैनी फलंदाजीतही तितकाच निष्णात आहे. अखेरच्या फळीत अनेकदा फटकेबाजी करताना आपण त्याला पाहिलं आहे.
-
गोलंदाजीची शैली, चेंडूची गती आणि स्विंग करण्याची कला यामुळे नवदीप हा भारतीय संघाचं भविष्य मानलं जातोय.
-
जिममध्ये वर्कआऊट करणं हा नवदीप सैनीचा आणखी एक आवडता छंद (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
दररोज व्यायाम करुन आपली फिटनेस लेव्हल कायम राखण्याकडे नवदीपचा भर असतो
-
सिक्स पॅक अॅबमधली नवदीपची ही पोज एखाद्या हिरोलाही लाजवेल अशी आहे.
-
सध्याच्या घडीला भारतीय संघाच काही खेळाडूंचा अपवाद वगळता आपल्या फिटनेससाठी सजग असलेला नवदीप हा एकमेव खेळाडू आहे.
-
जिममध्ये वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओ तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकत असतो.
-
पाहा आहे की नाही दमदार बॉडी…
-
आंतरराष्ट्रीय कारकिर्द वाढवायची असेल तर खेळाडूसाठी फिटनेस लेव्हल कायम राखणं गरजेचं असतं.
-
आजकाल अनेक खेळाडू सोशल मीडियावरही चांगलेच सक्रीय असतात
-
खेळासोबत आपल्या लुक्सकडेही त्यांचं चांगलच लक्ष असतं.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग