-
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याने जरी आपला भाऊ हार्दिकच्या नंतर संघात स्थान मिळवलं असलं, तरी त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे.
-
कृणालसाठी भारतीय संघाचे दरवाजे २०१७ च्या IPL फायनलनंतर उघडले. मुंबई इंडियन्सने तो हंगाम जिंकला होता तेव्हा कृणाल अंतिम सामन्याचा मानकरी होता.
-
IPL फायनलच्या रात्रीच त्याने आपला आयुष्याचा जोडीदार निवडला आणि गर्लफ्रेंड पंखुडीला प्रपोज केलं.
-
कृणाल आणि पंखुडी यांची ओळख एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघे चांगले मित्र झाले.
-
त्यानंतर दुखपतीवर उपचार घेण्यासाठी बराच काळ कृणाल मुंबईमध्येच होता, त्या काळात त्याची पंखुडीशी ओळख वाढली. दोघांमधील गाठीभेटी वाढल्या आणि ते एकमेकांना डेट करू लागले.
-
पंखुडीचे कुटुंब मुंबईत राहते. तिचे वडील राकेश शर्मा हे उद्योगपती आहेत. आई अनुपमा शर्मा गोव्यात इंटेरियर डिझायनर आहे. पंखुडीला मोठी बहीण आहे. पंखुडी घरातील शेंडेफळ आहे.
-
कृणाल स्वतःची लव्ह स्टोरी सांगताना म्हणाला होता, "पंखुडी माझी चांगली मैत्रीण होती. आम्ही दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो."
-
"मुंबईने फायनल जिंकली आणि मला सामनावीर घोषित केले त्यानंतर मी तिला प्रपोज करण्याचा विचार केला. मी जेव्हा तिला लग्नासाठी मागणी घातली तेव्हा तिने लगेच मला होकार दिला", असं कृणालने सांगितलं.
-
आपल्या लव्हस्टोरी बद्दल बोलताना पंखुडी म्हणाली, "सामना संपल्यावर कृणाल त्याच्या खोलीत गाणं गात आला. खोलीत हार्दिक, मी आणि संघातील काही खेळाडू आधीपासून बसलो होतो."
-
"त्या सगळ्या खेळाडूंसमोर कृणालने मला उभं राहायला सांगितलं आणि सगळ्यांसमोर मला प्रपोज केलं."
-
"मी कृणालचं असं रूप आधी कधीच पाहिलं नव्हतं. मला त्याने केलेलं रोमँटिक प्रपोज खूप आवडलं आणि मी होकार दिला", असं पंखुडीने सांगितलं.
-
सगळ्यांसमोर प्रपोज केल्यावर ती नाही म्हणाली असती तर? असा सवाल कृणालला एका मुलाखतीत करण्यात आला होता.
-
त्या प्रश्नावर कृणालने उत्तर दिलं, "क्रिकेटमध्ये पुढच्या चेंडूवर काय घडेल हे माहिती नसतं. तसंच इथेही होतं. आणि ती होकार देईल यांची मला खात्री होती."
-
दोन्ही कुटुंबातील लोकांच्या गाठीभेठी झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१७ ला कृणाल-पंखुडी विवाहबंधनात अडकले.
-
सर्व फोटो – इन्स्टाग्राम / कृणाल पांड्या

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली