-
जो रुटच्या नेतृत्वाखावी इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजवर मात करत अखेरचा कसोटी सामना जिंकला आणि मालिकेत २-१ ने बाजी मारली.
-
तब्बल ४ महिन्यांच्या कालावधीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं होतं. त्यामुळे या मालिकेत विजय मिळवणं हे दोन्ही संघांसाठी महत्वाचं होतं.
-
स्टुअर्ट ब्रॉडने या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करत आपला ठसा उमटवला. पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान न मिळालेल्या ब्रॉडने उर्वरित दोन सामन्यांत धडाकेबाज कामगिरी करत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं.
-
अखेरच्या कसोटी सामन्यात ब्रॉडने ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. क्रेग ब्रेथवेट हा ब्रॉडचा ५०० बळी ठरला.
-
स्टुअर्ट ब्रॉड म्हणलं की आपल्याला आठवण होते, २००७ साली टी-२० विश्वचषकात युवराज सिंहने एकाच षटकात मारलेल्या सहा षटकारांची…कोणताही गोलंदाज या घटनेनंतर खचून गेला असता. परंतू ब्रॉडने आपल्या कामगिरीत सुधारणा करत संपूर्ण जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं.
-
कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी घेणाऱ्या दिग्गज गोलंदाजांच्या यादीत ब्रॉडला स्थान मिळालं आहे.
-
कर्टनी वॉल्श यांनी २००१ साली कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. त्यांच्या खात्यावर ५१९ बळींची नोंद आहे.
-
फिरकीपटू शेन वॉर्नने २००४ साली ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. त्याच्या खात्यावर ७०८ बळींची नोंद आहे. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वॉर्न दुसऱ्या स्थानी आहे. (फोटो – पीटीआय)
-
श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरननेही २००४ सालीच ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. त्याच्या खात्यावर ८०० बळींची नोंद आहे. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुरलीधरन पहिल्या स्थानी आहे. (फोटो – पीटीआय)
-
ग्लेन मॅकग्राने २००५ साली ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. त्याच्या खात्यावर ५६३ बळींची नोंद आहे. (फोटो – पीटीआय)
-
भारताचा माजी कर्णधार आणि फिरकीपटू अनिल कुंबळेने २००६ साली ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. त्याच्या खात्यावर ६१९ बळी जमा आहेत. (फोटो – पीटीआय)
-
जेम्स अँडरसनने २०१७ साली ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. त्याच्या खात्यात ५८९ बळी जमा आहेत.
-
यानंतर तब्बल ३ वर्षांनी ब्रॉडने कसोटीत ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. सध्याच्या घडीला त्याच्या खात्यात ५०१ बळी जमा आहेत.

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”